90 लाखाच्या यांत्रिक बोटी नष्ट, प्रो. मयूर भुजबळ यांची वाळू माफिया विरोधात धडाकेबाज कारवाई


90 लाखाच्या यांत्रिक बोटी नष्ट, प्रो. मयूर भुजबळ यांची वाळू माफिया विरोधात धडाकेबाज कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 प्रोबेशनरी उपाधीक्षक मयुर भुजबळ यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की शिरापूर आणि हिंगणी बेरडी भागातील नदीपात्रामध्ये अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची खबर मिळाली त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल किरण डुके,विशाल जावळे, डी व्ही ढोले, वाय एस करचे,तसेच महसूल विभागाचे अधिकारी देऊळगाव चे सर्कल दादा संभाजी लोणकर, शिरापूरचे तलाठी दुष्यांत हरी पाटील, हिंगणी बेरडी गावचे तलाठी विनोद मोहनदास बोकडे सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन्ही ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले पोलिसांची चाहूल लागताच वाळू उपसा करणारे सर्वजण तेथून फरार झाले हे सर्व साहित्य जप्त करून घेऊन येणे शक्य नसल्याने महसूल विभागाच्या मदतीने जिलेटिनच्या साह्याने सर्व यांत्रिक बोटी उडवण्यात आल्या, हा सर्व मुद्देमाल 90 लाखांच्या आसपास असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल विषय जावळे यांच्या फिर्यादीवरून बाबू मोरे शिरापूर तालुका दौंड त्याचा मेव्हूना किशोर आणि इतर दोन व्यक्ती यांच्यावर दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला, दुसरी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल किरण डोके यांनी दिली असून त्यामध्ये गोकर्ण खेडकर राहणार शिरापूर तालुका दौंड आणि इतर दोन इसम यांच्यावर भादवि कलम 379, 439, 34 व गौण खनिज अधिनियम कलम 4,21 पर्यावरण संरक्षण अधिनियम 9,15 तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान अधिनियम 4 यानुसार सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते दौंड पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी उपाधिक्षक मयूर भुजबळ पोलीस निरीक्षक नारायण पवार दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस पथक आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News