कोरोना रुग्णांचे दोन दिवसात शतक उपजिल्हा रुग्णालय 77, तालुक्याच्या ग्रामीण भागात 48 रुग्ण


कोरोना रुग्णांचे दोन दिवसात शतक उपजिल्हा रुग्णालय 77, तालुक्याच्या ग्रामीण भागात 48 रुग्ण

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुका कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट झालाय परंतु मागील वर्षी मार्च महिन्यात इतके रुग्ण सापडले नव्हते त्याहीपेक्षा रुग्ण आत्ता सापडत आहेत, त्यावेळी कमी रुग्ण सापडत  असतानाही प्रशासनाने खबरदारी घेतली होती त्यापैकी 10 टक्के  खबरदारी जास्त रुग्ण सापडले असतानाही  प्रशासन घेताना दिसत नाही त्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, प्रशासन नक्की करतय तरी काय याबद्दल शंका निर्माण होऊ लागली आहे, 2020 साली मार्च पासून डिसेंबर पर्यंत जेवढे रुग्ण सापडले नव्हते तेवढे रुग्ण फक्त तीन महिन्यात सापडले आहेत तरीही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही, 23 आणि 24 मार्च रोजी अनुक्रमे 91 आणि 375 अशी एकूण 466 रुग्णांची अँटीजेन तपासणी करण्यात आली होती,त्यामध्ये 77 रुग्ण सापडले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, तालुक्यातील इतर गावांमध्ये दोन दिवसात 48 रुग्ण सापडले असल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी दिली आहे, बोरीभडक कानगाव, खामगाव, गोपाळवाडी, शिरापूर, वरवंड, वाळकी, भरतगाव, हिंगणीगाडा, हिंगणीबेरडी, भरतगाव, कुरकुभ, मलठण, डाळींब, वाटलुज, वासुंदे,यवत, कासुर्डी या गावातील 30 रुग्ण सापडले आहेत, मागील वर्षी तहसीलदार संजय पाटील, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा, पंचायत समिती BDO गणेश मोरे,नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश शिंदे,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक या सर्वांनी कडक धोरण अवलंबून  कोरोना रुग्णांवर आणि विनाकारण फिरणारा वर, गर्दी करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवले होते, प्रोबेशनरी उपविभागीय अधिकारी मयूर भुजबळ, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे परंतु आता दोनच दिवसात कोरोना रुग्णांनी शतक पूर्ण करूनही तहसील कार्यालय आणि नगरपरिषदेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे दौंड तालुक्यात चालले तरी काय अशी शंका आता निर्माण होऊ लागले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News