मनपा आरोग्‍य विभागाच्‍या वतीने जागतिक क्षयरोग दिन साजरा – नगर शहराची क्षयरोग मुक्‍तीकडे वाटचाल – डॉ.अनिल बोरगे


मनपा आरोग्‍य विभागाच्‍या वतीने जागतिक क्षयरोग दिन साजरा –  नगर शहराची क्षयरोग मुक्‍तीकडे वाटचाल – डॉ.अनिल बोरगे

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) -  अहमदनगर मनपाच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या वतीने राष्‍ट्रीय क्षयरोग दिनानिमित्‍त नगर शहरामध्‍ये जनजागृती अभियान राबविण्‍यात आले आहे. यामाध्‍यमातून नागरिकांमध्‍ये क्षयरोगाबद्दल जनजागृती होण्‍यास मदत होणार आहे. क्षयरोगाच्‍या रुग्‍णांना मनपाच्‍या वतीने मोफत आरोग्‍यसेवा देण्‍यात येणार आहे. खाजगी हॉस्पिटल मधील क्षयरोगाच्‍या रुग्‍णांनाही मोफत सुविधा दिली जाणार आहे. यासाठी हॉस्पिटनी मनपा आरोग्‍य विभाशी संपर्क साधावा. सकारात्‍मक दृष्‍टीकोनातून क्षयरोगाबद्दल काम सुरु असून  महाराष्‍ट्रामध्‍ये अहमदनगर मनपा क्षयरोग मुक्‍त शहर करणार आहे. वर्षांनुवर्ष क्षयरोगाच्‍या आजाराचे नाव आपण ऐकत आहोत मात्र भारतामध्‍ये चांगल्‍या प्रकारे काम केल्‍यामुळे भारत हा क्षयरोग मुक्‍ततेकडे वाटचाल करित असल्‍याचे प्रतिपादन डॉ. अनिल बोरगे यांनी केले.जागतिक क्षयरोग दिनानिमित्‍त व राष्‍ट्रीय क्षयरोग दुसरीकरण कार्यक्रमानिमित्‍त डॉ अनिल बोरगे बोलत होते. यावेळी सुरभी हॉस्पिटलचे डॉ राकेश गांधी, न्‍यूरोसर्जन डॉ.प्रशांत जाधव,डॉ.अमित पवार, क्षयरोग अधिकारी जयश्री रौराळे , पर्यवेक्षक मंगल हजारे, योगेश औटी,  आदी उपस्थित होते.  

   यावेळी क्षयरोग अधिकारी जयश्री रौराळे म्‍हणाले की, शहरामध्‍ये क्षयरोगा बद्दल नागरिकांमध्‍ये जनजागृती व्‍हावी यासाठी ठिकठिकाणी प्रबोधन कार्यक्रम आयोजन करण्‍यात आले होते. क्षयरोग हा संसर्गजन्‍य रोग असून त्‍याची लक्षण आढळल्‍यास तात्‍काळ आरोग्‍य केंद्राशी संपर्क साधावा क्षयरोग हा बरा होणारा आजार असून त्‍याच्‍यावर उपचार घेणे गरजेचे आहे.  यासाठी शहरामध्‍ये मनपाच्‍या आरोग्‍य केंद्रामध्‍ये रूग्‍णांनी संपर्क साधावा असे त्‍या म्‍हणाल्‍या.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News