अहमदनगर जिल्हा क्षयरोग केंद्रात जागतिक क्षयरोग दिन साजरा


अहमदनगर जिल्हा क्षयरोग केंद्रात जागतिक क्षयरोग दिन साजरा

शिर्डी, राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

24 मार्च 2021, जागतिक क्षयरोग दिन. या दिवशी  सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत अहमदनगर, येथील जिल्हा क्षय रोग केंद्र या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी  मा ,D,T,O ,डॉ पोटे साहेब ,A,D,H,O मा. डॉ दहिफळे साहेब,मा, डॉ काकडे साहेब, मा,डॉ साळुंके साहेब, मा,डॉ सूर्यवंशी साहेब मा,डॉ घुले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले , मा,D,T,O,डॉ, पोटे यांनी या संदर्भात सखोल माहिती दिली  या प्रसंगी अनेकांनी आपले मनोगत वेक्त केले, 

T B हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस या बॅक्टेरिया मुळे होतो.  याचा प्रसार TB च्या पेशंटच्या खोकल्यातून किंवा थुन्कितुन हवेतून प्रसरन्यामुळे होतो. अशाप्रकारे होणारा हा एक खूप भयंकर चिकट आणि औषधोपचाराला लवकर न जुमानणारा आजार आहे TB विरुद्ध लढाईमूळेच आज २००० साला पासून जवळजवळ ६ कोटी  लोकांचा जीव वाचलेला आहे.

 २४ मार्च, हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. सुमारे १४० वर्षापूर्वी १८८२ साली डॉ. रॉबर्ट कोच यांनी TB च्या बॅक्टेरियाला शोधून काढले. क्षयरोगाचे कारण शोधले. यामुळे पुढे मग या आजारावरिल उपचार, अभ्यास, विविध तपासणी आणि संसर्गक्षमता पुढे लस विकसित करणे या गोष्टी शक्य झाल्या.

  म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून जनजागृती, TB बद्दल जाण / ज्ञान वाढवण्यासाठी २४ मार्चला जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो.

    नवीन झालेल्या कोरोणाच्या संकटामुळे लक्ष TB आजारापासून अभिजीत योजना राबवन्यापासून विचलित झाले आहे आणि त्यामुळे क्षयरोग नियंत्रण हा मुद्दा थोडासा झाकोलला गेला आहे.  

     त्यामुळे यावर्षी टिक टिक करणाऱ्या घड्याळाचे चिन्ह देऊन सांगत आहोत कि वेळ निघून चालला आहे. आपले ध्येय साध्य करने अवघड बनत चालले आहे.

   साथरोगांचे उच्चाटन करायचे असेल तर त्याच्या वेळो वेळी तपासण्या TB च्या प्रसराचा धोका असलेल्या वस्त्या, पटकन  आजाराची लक्षणे हेरणे, योग्य ती खबरदारी, उपचार आणि रोगी लोकांचा पाठपुरावा पूर्ण उपचार घेण्यास सक्ती करणे या गोष्टी अत्यंत काटेकोर पणे आणि नियमित वर्षानुवर्षे सातत्याने कराव्याच लागतील.

       क्षयरोग झाल्यास त्वरित उपचार सुरु केल्यास, योग्य आहार घेतल्यास लवकर आटोक्यात येतो व शरिरास कमी हानी पोहचवतो. तसेच इतर आजुबाजुच्या व्यक्तींनाही त्याचा प्रसार थोपविला जातो.

       म्हणूनच सरकार या आजाराकडे गांभीर्याने बघते. या आजाराची सर्व औषधे सरकारी दवाखान्यात पूर्णपणे मोफत मिळतात. पेशंटना औषधे नीट सेवन करावे त्यासाठी त्यांना औषधी T. B. हेल्थ वर्कर घ्यायला लावली जातात.

       पूर्वीच्या काळी T. B. झालेला पेशंट / रोगी खंगून खंगून शरीराचा अस्थिपंजर होऊन यमलोकी जायचा. म्हणूनच त्याला क्षयरोग ( क्षती करणारा- संपवणारा) आजार असे म्हणायचे.

      म्हणूनच मित्रांनो आताही अत्यंत कळची वेळ आलेली आहे आपल्याला क्षयरोगाची उचलबांगडी करायची आणि त्यासाठी लागणार आहे असे मत वेक्त केले सदर कार्यक्रमास श्रीमती सुनीता सहाणे म्याडम,श्रीमती घोडेराव म्याडम,श्रीमती मूळे म्याडम,श्रीमती सानप म्याडम,श्रीमती पागिरे म्याडम,श्रीमती खान म्याडम,श्रीमती देशमुख म्याडम, श्रीमती नरसाळे म्याडम,आदींसह सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

           *जागर आपल्या क्षयरोगसाठीचा,* 

         *T B च्या समूळ उच्चाटानाचा,* 

         *क्षयरोग विरहित भावी भविष्याचा,* 

         *प्रयत्न निरोगी निडर भावी पिढीचा.*

    हा संदेश या प्रसंगी देण्यात आला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News