निमगाव वाघात ग्रामस्थांची कोरोना चाचणी


निमगाव वाघात ग्रामस्थांची कोरोना चाचणी

कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक -पै.नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात झालेल्या कोरोना चाचणीस गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.

आरोग्य सेविका सलिमा पठाण, आरोग्य सेविक निलेश हराळ, ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, भाऊसाहेब ठाणगे, मदतनीस रेखा ठोंबरे, सलिम मोहंमद, घनश्याम कदम, संदिप येनारे, शंकर कापसे, पप्पू शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी  कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे म्हणाले की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी निष्काळजीपणाने न वागता कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे पालन केल्यास कोरोनाला रोखता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांची प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी आरोग्य सेविका सलिमा पठाण, आरोग्य सेविक निलेश हराळ, ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, भाऊसाहेब ठाणगे, मदतनीस रेखा ठोंबरे, सलिम मोहंमद, घनश्याम कदम, संदिप येनारे, शंकर कापसे, पप्पू शेख आदी

जाहिरात
Search
विडिओ
Recent News