दौंड आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम 10047 लोकांना कोविड लस, दौंड उपजिल्हा रुग्णालयत 36 दिवसात 4088 लोकांना दिली लस


दौंड आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम 10047 लोकांना कोविड लस, दौंड उपजिल्हा रुग्णालयत 36 दिवसात 4088 लोकांना दिली लस

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

- दौंड उपजिल्हा रुग्णालय सह तालुक्यात आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम  हेल्थ वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर, यासह जेष्ठ नागरिक यांना  10047 लोकांना कोविड लस देण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी सांगितले आहे,तर दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 36 दिवसात 4088 लोकांना कोविड लस देण्यात आल्याचे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 232 जणांची अँटीजेण तपासणी करण्यात आली होती त्यापैकी 36 जण पॉझिटिव्ह आले असून 26 पुरुष 10 महिलांचा समावेश या रुग्णांमध्ये आहे शहरातील 19 तर  ग्रामीण भागातील 17 रुग्ण असल्याचे डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले, दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात  218 जणांची RTPCR आणि रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात आली होती त्यापैकी 30 जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी सांगितले आहे, यामध्ये बोरिपारधी, बोरिएेदी,  एकेरीवाडी, राहु, केडगाव, पाटस, यवत, देलवडी, हिंगणी गाडा, खामगाव, कानगाव, नानगाव, पारगाव, खुटबाव, पाटस, वरवंड, कुरकुभ, रोटी या भागातील रुग्ण आढळले आहेत, ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे लोकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये,सतत मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ  धुवावेत, जेवण भरपूर करावे, कोमट पाणी प्यावे,सर्दी, खोकला, थंडी ताप असल्यास त्वरित जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टर सुरेखा पोळ यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News