शिरूर नगरपरिषदेच्यावतीने शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असुन चांगले काम होण्यासाठी नागरिकांनी विकास कामांच्या दर्जाकडे लक्ष द्यावे असे आवाहन शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.सुभाष पवार यांनी केले.

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी:

            शिरूर शहरातील सिध्दार्थ नगर येथील रस्त्याच्या ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाच्या २७ लाख ६१ हजार रूपये कामाचे भुमिपूजन शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. पवार यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

            यावेळी नगरपरिषद बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे,स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार,माजी उपसरपंच संजय शिंदे,लहुजी शक्ती सेनेचे बंटी जोगदंड,सतीष घोलप,सतीष बागवे यांसह परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

        शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल,नगराध्यक्ष वैशाली वाखारे व सर्व नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली शहरात नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीने विकास कामे सुरू असुन सिध्दार्थ नगर परिसरातील नागरिकांची रस्त्याबाबतची मागणी लक्षात घेऊन या रस्त्याचे काम नगरपरिषदेने हाती घेतले असुन शहरातील इतर भागातही विकास कामे सुरू करण्यात आले असल्याचे यावेळी बोलताना बांधकम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News