कारवाईतील ट्रक तहसिल गेटच्या बाहेर नेवुन वाळु कमी करून पुन्हा आणुन लावल्याप्रकरणी सहा जणांना अटक


कारवाईतील ट्रक तहसिल गेटच्या बाहेर नेवुन वाळु कमी करून पुन्हा आणुन लावल्याप्रकरणी सहा जणांना अटक

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी:

अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना पकडलेला हायवा ट्रक शिरूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून नेऊन त्यातील वाळू कमी करून पुन्हा तहसील कार्यालय आवारात आणून लावल्या प्रकरणी तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी,हायवा ट्रकचा मालकासह इतर तीन साथीदार असे सहा जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली. 

           शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,याबाबत तलाठी सरफराज देशमुख यांनी फिर्याद दिली असुन याप्रकरणी विजय धोंडीबा कोळपे (रा. निमोणे, कुऱ्हाडवाडी ता. शिरूर जि. पुणे), सुरेश ठकाजी पाचर्णे(रा तर्डोबाचीवाडी शिरूर जिल्हा पुणे), संभाजी सुकलाल गुंजाळ,नारायण गणपत डामसे (दोघेही तहसील कार्यालय कर्मचारी), संतोष अशोक गिरमकर (कुऱ्हाडवाडी निमोणे ता शिरूर), महेश गणपत अनुसे (निमोणे ता शिरूर) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

दि ०४/०३/२०२१ रोजी मंडळ अधिकारी शिरूर यांनी अवैदय वाळु वाहतुक करणारा हायवा ट्रक नं एम एच १२ आर एम ९९७० हा मौजे कु-हाडवाडी परीसरात कारवाई करून ट्रकमधील वाळुचा सदर ठिकाणी पंचनामा केला त्यावेळी त्यामध्ये सहा ब्रास वाळु मिळुन आली होती.सदर हायवा ट्रक हा पुढील कारवाई करीता शिरूर तहसील कार्यालय येथे आणुन लावला होता.याबाबत हायवा ट्रक मालक विजय धोंडिबा कोळपे रा.निमोणे,कु-हाडवाडी ता.शिरूर,जि.पुणे यांना शिरूरचे तहसीलदारांनी सहा ब्रास वाळुची व वाहनाची दंडाची रक्कम अशी एकुण ४ लाख ४७ हजार ७७५ रूपये दंडाची नोटीस दिली होती.

        दि.१९ मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास ते २० मार्च पावणे एकच्या दरम्यान हायवा  ट्रकचा मालक विजय कोळपे यांना दंडाची नोटीस दिली असताना सदर दंड कमी करण्यासाठी विजय कोळपे याने संभाजी गुंजाळ, नारायण डामसे, सुरेश पाचर्णे, संतोष गिरमकर, महेश अनुसे या सर्वांनी मिळून महसूल कार्यालय शिरूर मधील शिपाई यांना हाताशी धरून संगणमत करून अवैध वाळू वाहतूक करीत असताना मिळून आलेला हायवा हायवा ट्रक एम एच १२ आर एम ९९७० महसूल विभागाचे कायद्याशीर रखवालीत असताना तो तहसील कार्यालयाचे गेटमधून बाहेर नेऊन त्यामध्ये असलेली अवैध वाळू अंदाजे पाच ब्रास कोठेतरी टाकून देवुन पुन्हा ट्रक तहसील कार्यालयाचे गेटच्या आत आणून लावला.हि सर्व घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेने हा गुन्हा उघडीस आला आहे.

        शिरूरचे तलाठी सरफराज तुराब देशमुख यांच्या फिर्यादीवरून वरील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेली वाहने व चोरून नेऊन टाकलेली वाळु जप्त करून वरील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहे.

झारीतील शुक्राचार्य कोण ? नागरीकांमधुन केला जातोय प्रश्न उपस्थित

शिरूर तहसिल कार्यालयाच्या आवारातुन हाकेच्या अंतरावरील पोलीस स्टेशनच्याजवळुन अवैद्य वाळु वाहतुक करत असलेला कारवाईतील ट्रक गेटच्या बाहेर जावुन वाळु कमी करून पुन्हा तहसीलच्या गेटच्या आत आणुन लावला जातो.याबाबत गुन्हा दाखल होवुन सहा जणांना अटक करण्यात आली परंतु तहसील कार्यालय कार्यालयाच्या आवारातुन ट्रक बाहेर गेलाच कसा यावरून तहसील कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन परिसरात एजंटांचाही सुळसुळाट झाला आहे याला आवर कोण घालणार ? तसेच तालुक्यात अवैद्या वाळु उपसा व वाहतुक होत असल्याचे यावरून सिद्ध होत असुन या मागील झारीतील शुक्राचार्य कोण ? असे प्रश्न नागरिकांमधुन उपस्थित केले जात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News