भाजपच्यावतीने देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी शिरूर आंदोलन


भाजपच्यावतीने देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी शिरूर आंदोलन

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी:

पोलीस यंत्रणेचा खंडनीसाठी गैरवापर करणा-या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिरूर शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 

          शिरूर येथील शिवसेवा मंदिरासमोर गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्यावर झालेल्या शंभर कोटीच्या आरोपाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी रविवार दि.२१ रोजी शहर भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

     यावेळी कार्याध्यक्ष मितेशभैया गादिया,संघटन सरचिटणीस नवनाथ ‌जाधव,सरचिटणीस विजय नर्के,शिरूर प्रवासी संघटनेचे अध्याक्ष अनिल बांडे, उपाध्यक्ष निलेश नवले,युवामोर्चा अध्यक्ष उमेश शेळके,माजी शहराअध्यक्ष केशव‌ लोखंडे,युवामोर्चा सरचिटणीस ओंकार ससाणे, महिला अध्यक्ष रश्मी क्षीरसागर, उपाध्यक्ष रेश्मा शेख, उपाध्यक्ष कौस्तुभ उबाळे, सोशल मीडिया अध्यक्ष हर्षद ओस्तवाल,तालुका संपर्क प्रमुख बाबुराव पाचंगे,रोहित जाधव,अक्षय मरकळ भाजपा कार्यकर्ते  उपस्थिति होते. 

 महाराष्ट्रातील महाविकास आघाडी भ्रष्ट सरकार असून या सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणी करून देशमुख यांनी लवकर राजीनामा दिला नाही तर भाजपाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News