भ्रष्टाचारी गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा म्हणून कर्जत तालुका भाजपाच्या वतीने निदर्शन करण्यात आले


भ्रष्टाचारी गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा म्हणून कर्जत तालुका भाजपाच्या वतीने निदर्शन करण्यात आले

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी :

आज कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या खात्यातील पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबईतून दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी गोळा करण्याचा आदेश दिला होता. यावेळी गृहमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात असा खळबळ जनक उल्लेख केलेला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आले. 


 यावेळी बोलताना कर्जत नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले की राज्यातील गृहमंत्र्यांनी सचिन वाजे या पोलिस अधिकाऱ्याला महिन्याला शंभर कोटी रुपये खंडणी गोळा करण्यासाठी ठेवले होते ही बाब अतिशय निंदनीय आहे असे नामदेव राऊत यांनी म्हटले पोलिसांकडे कायदा व सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी असते असे असताना सुद्धा मंत्री अनिल देशमुख यांनी खंडणी गोळा करण्याचे काम दिले असून एवढे भ्रष्ट सरकार इतिहासात कधीच सत्तेवर पाहिले नव्हते असा घणाघात नामदेव राऊत यांनी यावेळी केला ते म्हणाले की आघाडी सरकारने ताबडतोब राजीनामा द्यावा अन्यथा यापुढे कर्जत तालुक्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

  या आंदोलनात बोलताना भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे म्हणाले की राज्याचे गृहमंत्री महिन्याला जर 100 कोटी रुपये खंडणी फक्त मुंबईतून गोळा करा सांगत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती खंडणी गोळा करायला सांगत असतील याचा विचार सामान्य जनतेने करावा असे सचिन पोटरे म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की सरकारच्या या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करत असून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर कर्जत तालुक्यातील सर्व गावांमध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत असा इशारा पोटरे यांनी दिला. यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख  विनोद दळवी म्हणाले की या आघाडी सरकारला राज्यातील जनतेचे कसलेही देणेघेणे नसून या सरकारने फक्त राज्यात वसुली मोहीम राबवली असून जर गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा तात्काळ मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही तर कर्जत तालुका भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे विनोद दळवी यांनी म्हटले आहे.                     या आंदोलनात कर्जत नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, डॉक्टर विलास राऊत, उमेश जेवरे, सुनील यादव, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील गावडे, विनोद दळवी, भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, पप्पू शेठ धोदाड, अनिल गदादे, अमृत काळदाते, गणेश शिंदे, राजेंद्र येवले, कृष्णा क्षीरसागर, वृषभ मगर, कृष्णा खराडे इत्यादी सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News