कोरोना महामारीत सर्वसामान्यांना मोफत आरोग्यसुविधा पुरविल्याबद्दल..फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांचा सन्मान


कोरोना महामारीत सर्वसामान्यांना मोफत आरोग्यसुविधा पुरविल्याबद्दल..फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांचा सन्मान

महामारीत फिनिक्सने गरजूंना निस्वार्थ रुग्णसेवा पुरविली -डॉ. संजय कळमकर

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - कोरोना महामारीत सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेतल्याबद्दल गणराज प्रकाशन रंगनाथ उर्फ तात्यासाहेब भापकर गौरव समितीच्या वतीने फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला. 

कोहिनूर मंगल कार्यालयात येथे झालेल्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे, ज्येष्ठ साहित्यिक सिने गीतकार बाबासाहेब सौदागर व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांच्या हस्ते बोरुडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रंगनाथ उर्फ तात्यासाहेब भापकर, साहित्य परिषदेचे चंद्रकांत पालवे, प्राचार्य अशोक दोडके, जिल्हा मराठा संस्थेचे संस्था अधीक्षक मोडवे भाऊसाहेब, दत्तापाटील नारळे, डॉ. घाडगे पाटील, मंगेश भापकर, ग.ल. भगत आदी उपस्थित होते.डॉ. संजय कळमकर म्हणाले की, टाळेबंदी काळात सर्वसामान्यांची व हातावर पोट असलेल्या कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असताना, गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने फिनिक्स फाऊंडेशनने विविध शिबीरे घेतली. मागील आठ ते नऊ महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा तब्बल हजारो रुग्णांनी लाभ घेतला. तर अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्याच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम केले. कोरोना व महागाईच्या संकटात माणुसकीच्या भावनेने अनेक गरजूंना आरोग्यसुविधा देण्याचे अविरत सुरु असलेले त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी गरजू रुग्णांची पैश्यांमुळे परवड होऊ नये, यासाठी गोर-गरीब रुग्णांकरिता फिनिक्स फाऊंडेशन महत्त्वाची भूमिका पार पाडली. आजही सर्वसामान्यांसाठी शिबीर सुरु आहेत. गोर-गरीबांचे आरोग्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सुरु असलेले फिनिक्सचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. असून, सिने गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी फिनिक्स फाऊंडेशनची निस्वार्थ रुग्णसेवा ही ईश्‍वरसेवा असल्याची भावना व्यक्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News