महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात गेल्या 24 तासात 77.7 % नव्या रुग्णांची नोंद


महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात गेल्या 24 तासात 77.7 % नव्या रुग्णांची नोंद

4 कोटी 40 लाखांहून जास्त जणांचे कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण

देशातील काही राज्यांमधे रुग्णवाढीचा वेग दररोज झपाटयाने वाढत आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात गेल्या चोवीस तासात 77..7% नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या 24 तासांत 43,846 नवीन रुग्णसंख्या नोंदली गेली.

नवीन प्रकरणांपैकी 83.14% प्रकरणे 6 राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण कायम आहे. इथे गेल्या चोवीस तासात 27,126 रुग्ण आढळले. त्या पाठोपाठ पंजाबात. 2,578 तर केरळमधे 2,078 नवे रुग्ण आढळले आहेत.

खालील आलेखात दर्शवल्याप्रमाणे आठ राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि पाच जिल्ह्यांमधे एकूण देशातले सर्वाधिक नवीन रुग्ण आहेत.

4.4 कोटी पेक्षा जास्त ( 4,46,03,841) लसीकरण आतापर्यंत झाले आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार 7,25,138 सत्रांमधे हे  लसीकरण करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News