विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
दौंड- शहरासह परिसरामध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन कडून विनाकारण फिरणारे,विना मास्क फिरणारे, विना लायसन तसेच ट्रिपल सिट फिरणारावर कडक कारवाई करण्यात आली आहे, शासनाच्या नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई केली जाईल असे परिविक्षाधीन अधिकारी मयुर भुजबळ यांनी सांगितले आहे,
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दौंड पोलिसांनी कडक नियम जारी केले आहेत, जो कोणी या नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई देखील सुरू केली आहे,दि. 19/20 मार्च 2021 रोजी सांयकाळी 5 ते 7 वा दरम्यान या दोन तासांत विना मास्क फिरणाऱ्यावर दौंड शहर, भाजी मंडई, गोल राऊंड, सरपंच वस्ती भाजी मंडई या परिसरामध्ये कारवाई करण्यात आली दौंड शहरातील एका हॉटेलवर क्षमतेपेक्षा् जास्त व्यक्ती असल्यामुळे हॉटेल मालकावर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे,या कारवाई दरम्यान दोन दिवसात विनामास्क 160 केसेस एकूण 30500 रु दंड,आस्थापना वर 5 केसेस 2500 रुपये, दंड व भा.द.वी.का.क.188 प्रमाणे 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दौंड येथे 40केस,कुरकुंभ 10केस,रावणगाव 10 केस,दंड 10000,वाहतूक केस 32 त्यामध्ये 6600 रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले, पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांसाठी खालील नियम जारी करण्यात आले आहेत हॉटेल रेस्टॉरंट, लॉज,बार,परमिट रूम, हे सर्व 50%क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत चालू ठेवावे व पार्सल सेवा रात्री 11 वा. पर्यँत चालू ठेवावी,पान टपरी वर एका वेळी 5 लोकांना परवानगी राहील,लग्न समारंभात पोलिसांच्या पूर्व परवानगीने फक्त 50 लोकांना परवानगी राहील,अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी असेल,आठवडा बाजार हा शिफ्ट मध्ये भरवण्यात यावा,सर्व ग्रामपंचायत व नगरपरिषद याचा पाठपुरावा करतील,सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमासाठी कोणीही नागरिक एकत्र येणार नाहीत,सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे त्याचबरोबर सॅनिटायजर चा वेळोवेळी वापर करणे,सोशल डिस्टन्स पाळणे,सर्व सार्वजनिक ठिकाणांवर सॅनिटायजर चा वापर करणे आवश्यक आहेकाळजी घ्या,सतर्क रहा,नियमांचे पालन करावे,कोरोना पासून बचाव करण्यासाठी सतर्क राहणे खूप गरजेचे आहे,या कारवाई मध्ये परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, हवा पांडुरंग थोरात,पो हवा चौधरी,पो काँ शेखर झाडबुके,अमजद शेख,होमगार्ड वाघमारे,राऊत,भोसले, वार्डन शिंदे यांनी भाग घेतला होता, सर्वांनी नियमांचे पालन करावे, सदर बाबींचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे दौंड प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.