शिक्षण व कला क्षेत्रात महत्त्वपुर्ण योगदान देणारे हेरंब कुलकर्णी व शिल्पकार प्रमोद कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी


शिक्षण व कला क्षेत्रात महत्त्वपुर्ण योगदान देणारे  हेरंब कुलकर्णी व शिल्पकार प्रमोद कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी

स्वयंसेवी संघटनांच्या वतीने राष्ट्रपतींना शिफारसपत्र 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - शिक्षण व कला क्षेत्रात महत्त्वपुर्ण योगदान देणारे जिल्ह्याचे सुपुत्र हेरंब कुलकर्णी व शिल्पकार प्रमोद कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी व शिफारस पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे शिफारसपत्र राष्ट्रपतींना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन सर्वसामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी हेरंब कुलकर्णी विशेष प्रयत्न करीत आहे. आजच्या शिक्षकांपुढे ते एक आयडॉल असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. शिक्षण क्षेत्रात स्वत:ला झोकून ते कार्य करीत आहे. पगाराची आवश्यक तेवढीच रक्कम घेऊन त्यांचे विद्यादानाचे पवित्र कार्य सुरु आहे. तसेच शिल्पकार प्रमोद कांबळे आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक उत्तम कलाकृती साकारल्या आहेत. देशासह परदेशात देखील त्यांच्या कलेला तोड नाही. अनेक कलाकार देखील त्यांनी घडविले आहे. त्यांच्या शिक्षण व कला क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन आजच्या शिक्षकांपुढे ते एक आयडॉल असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. शिक्षण क्षेत्रात स्वत:ला झोकून ते कार्य करीत आहे. पगाराची आवश्यक तेवढीच रक्कम घेऊन त्यांचे विद्यादानाचे पवित्र कार्य सुरु आहे. तसेच शिल्पकार प्रमोद कांबळे आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक उत्तम कलाकृती साकारल्या आहेत. देशासह परदेशात देखील त्यांच्या कलेला तोड नाही. अनेक कलाकार देखील त्यांनी घडविले आहे. त्यांच्या शिक्षण व कला क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी व शिफारस पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अशोक सब्बन, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा आदी प्रयत्नशील आहेत.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News