मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी:
संगमेश्वर : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, संगमेश्वर अंतर्गत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका या रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज दि. 30 मार्च पर्यंत मागविण्यात आले आहेत.
अंगणवाडी सेविकामध्ये देवरूख वरची आळी, कडवई विकासनगर, अंत्रवली, डिंगणी गुरववाडी, सरंद ब्राह्मणवाडी, कोंडये मधलीवाडी, देवळे जगलवाडी, मेढे त. फुणगुस येथे रिक्त पदे असून मिनी अंगणवाडी सेविकामध्ये देवरूख पठारवाडी, करजुवे शाळा नं.३, मासरंग येथे रिक्त पदे आहेत.
या पदांसाठी जाहीरनामा व नमुन्यातील अर्ज इ. कागदपत्रे संबंधित ग्रामपंचायतींकडे देण्यात आलेली आहेत. तरी वय वर्ष किमान २१ तर कमाल ३० वर्ष तसेच शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवारांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे संपर्क साधून विहित मुदतीत अर्ज सादर करावेत असे आवाहन वंदना यादव बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, संगमेश्वर यांनी केले आहे.