पडवी येथे अपघातात पंजाब येथील गहू मशीन चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यु


पडवी येथे अपघातात पंजाब येथील गहू मशीन चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यु

पडवी (ता.दौंड) : येथील शिरुर-सुपा  रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत पंजाब येथील गहू मशीन चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू  झाला असल्याची माहिती पाटस पोलिसांनी दिली आहे.

  या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बलदेव बलविर सिंग यांच्या दुचाकी गाडीस अज्ञात वाहनाची जोरात धडक बसून अपघात झाला. बलदेव सिंग यास डोक्यास व हातापायाला मोठी दुखापत झाल्याने उपचारासाठी बोरिपारधी येथील खाजगी दवाखान्यात नेले असता पुढील उपचारासाठी त्यांना यवत येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा बलदेव बलविर सिंग हे उपचारपूर्वीच मयत झाल्याचे सांगण्यात आले.

       यवत पोलिसांत अपघातातील मृत व्यक्तीचा भाऊ सुरेंद्र बलविर सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवार (दि.१९) रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास पडवी (ता.दौंड) येथील हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ शिरूर- सुपा डांबरी रस्त्यावर एका अज्ञात वाहन चालकाने अविचाराने, नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगात घेऊन जात असताना पंजाब येथील गहू मशीन चालक दुचाकी गाडीने प्रवास करीत असताना बलदेव बलविर सिंग (वय-३४, सध्या रा. सुपा ता-बारामती मुळगाव-पंजाब येथील तालुका- रंगेडीकला जिल्हा- फतेहगड) यांच्या ताब्यातील दुचाकी गाडी नंबर (पीबी-२३ आर १२१४) ला धडक बसून अपघात झाला असून या अपघातात त्यांना मोठी दुखापत होऊन मृत्यू झाला आहे. अपघाताची खबर न देता अज्ञात वाहन तेथून निघून गेले असून अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस सहायक फौजदार सागर चव्हाण करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News