साईबाबाबा संस्थानच्या रूग्णालयातील औषद घोटाळा प्रकरणी चोकशी करा...रमेश गोंदकर


साईबाबाबा संस्थानच्या रूग्णालयातील औषद घोटाळा प्रकरणी चोकशी करा...रमेश गोंदकर

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे

साईबाबाबा संस्थानच्या रूग्णालयातील औषद घोटाळा सखोल चौकशी करण्याबरोबरच हॉस्पिटलमधील प्रभारीराज संपवण्यासाठी संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज  बगाटे यांनी कठोर निर्णय घेवून रूग्णालयातील बेबंदशाही व चमकोगीरीला लगाम घालावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते   रमेश गोंदकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिर्डी शहरातील पदाधिका-यांनी केली आहे .

साईबाबासंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,साईबाबांनी  आपल्या संपुर्ण हयातीत दुखीः व गोर गरीब पिडीतांचीसेवा केली. रूग्णसेवेचे हेच व्रत पुढे श्री साईबाबा व साईनाथ रूग्णालयाच्या माध्यमातुन सुरू आहे. मात्र तदर्थ समितीच्या बैठ्ठकांना मोठा विलंब होत असल्याने  अलिकडच्या काळात संस्थान रूग्णालये आणी संस्थान प्रशासनाला अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने दर महीण्याला संस्थान तदर्थ समितीची बैठ्ठक घेतली जावी ,स्थानिक    राजकीय नेत्यांच्या पुढेमागे धावणा-या हॉस्पिटलमधील प्रभारी अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच औषध खरेदीला मान्यता असतानाही ती कमी प्रमानात खरेदी का करण्यात आली . या प्रकरणी संबधीतांचे आणी खाजगी औषध विक्रेत्यांचे आर्थिक हितसंबध आहे का ? औषध खरेदीसाठीच्या टेंडर प्रक्रीयेसाठी दिड वर्षे लागतीत का ? संस्थान रूग्णालयातील कोणत्या कर्मचा-यांच्या कुटूंबातील औषधी विक्री व्यवसाय आहे का ? या औषध खरेदी प्रकरणाशी त्यांचा  संबंध क़ाय आहे  याची सखोल चौकशी  व्हावी . दरवर्षी  ५० कोटी रूपये औषधांच्या खरेदीसाठी तरतुद असताना की गेल्या तीन चार अवधी वीस कोटीची खरेदी का करण्यात आली?  जाणीवपुर्वक औषधे खरेदी न करता रूग्णांना बाहेरून औषधे घेण्यासाठी भाग पाडले जाते का ?. या औषध घोटाळ्याची चौकशी करून या घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधारांवर कारवाई करावी .अशी मागणीही बगाटे यांचेयाकडे करण्यात आली . साईबाबा व साईनाथ रूग्णालयातील आरोग्यसेवा  अद्ययावत संगणक प्रणाली द्वारे जोडली जावी . त्यामुळे रूग्णांच्या पुर्वीच्या आजारांची माहीती व सध्याची डॉक्टरांनी सुचवलेली औषधे याचा डाटा संस्थानकडे उपलब्द होवू शकेल . श्री साईबाबा संस्थानने खरेदी केलेली सर्व औषधे याचा लेखाजोखा ठेवण्यासही मदत होऊ शकते. रूग्णालयांचा कारभार  मोठा कारभार असतांना तो संगणकीकृत करण्याचा निर्णयही लवकर घ्यावा .संस्थानच्या साईबाबा आणी साईनाथ या दोन्ही  रूग्णालयातील  मेडीकल डायरेक्टर, सुपरीडेंट अँडमिनिट्रीव्ह ,पिआरओ आदी पदे  त्वरीत भरण्यात  येवून हॉस्पिटलमधील प्रभारी राज संपवावे  असे आवाहनही करण्यात आले .रमेश  गोंदकर,सुधाकर  शिंदे ,महेंद्र शेळके ,संदीप सोनवने ,निलेश कोते, अमित शेळके ,विशाल भडांगे ,राहुल कुलकर्णी ,प्रकाश गोंदकर,दिपक गोंदकर,राकेश कोते,चंद्रकांत गोंदकर आदी उपस्थीत होते 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News