रत्नागिरी जिल्ह्यातील कारखान्यातील स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
“रत्नागिरी जिल्ह्यातील कारखान्यात झालेल्या स्फोटात काही नागरिकांना जीव गमवावा लागला हे अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या प्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. या घटनेत जखमी झालेल्यांच्या आरोग्यात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना करतो.” असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.