दौंड शहरासह तालुक्यात कोरोना च्या नावाखाली खाजगी दवाखान्यात होणारी लूट थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन


दौंड शहरासह तालुक्यात कोरोना च्या नावाखाली खाजगी दवाखान्यात होणारी लूट थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड शहरासह तालुक्यात कोरोना च्या नावाखाली खाजगी दवाखान्यातून रुग्णांची होणारी लूट थांबवावी यासंदर्भात दौंड शिवसेनेच्या वतीने जिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांना निवेदन देण्यात आले आहे,दौंड शहर व तालुक्यात शासनाने जाहीर केलेल्या कोवीड हॉस्पीटल मध्ये उपचाराच्या नावाखाली लाखो रूपयांचे बिल आकारले जात  असून कोवीड च्या नावाखाली चालू असलेली लूट त्वरित थांबवावी अशी मागणी शिवसेना दौंड विधानसभा नेते अनिल तात्या सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालय चे अधिक्षक डाॅ.संग्राम डांगे यांच्याकडे एका निवेदन व्दारे केली. शासकीय दरानुसार बिल आकारणी दराचा फलक दवाखान्यात दर्शनी भागात लावणे, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ सरसकट सर्व रूग्णांना मिळावा, अशी मागणी करण्यात आली.रुग्णांच्या नातेवाइकांकडून आमच्यापर्यंत तक्रारी आलेल्या आहेत तरी यावर लवकरच निर्णय घेण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी संतोष जगताप, नामदेव राहींज,गणेश दळवी,शैलेश पिल्ले, रोहन घोरपडे, संदिप बारटक्के इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News