भारत क्षयरोग परिषदेला डॉ. हर्ष वर्धन यांनी केले संबोधित


भारत क्षयरोग परिषदेला डॉ. हर्ष वर्धन यांनी केले संबोधित

“नि:क्षय पोषण योजने” अंतर्गत पोषण सहाय्याच्या स्वरुपात गेल्या वर्षी सुमारे 11 लाख 10 हजार रुग्णांना 249 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचे सरकारकडून वाटप

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इंडिया टीबी समिट अर्थात भारत क्षयरोग परिषदेत बीजभाषण केले. येत्या 24 मार्च2021 रोजी जागतिक क्षयरोग दिवस पाळला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सरकार क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनास उच्च प्राधान्य दिले आहे. शाश्वत विकास उद्दीष्ट (एसडीजी) या अंतर्गत 2030 मधे हे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण पाच वर्ष पुढेच आहोत असे ते म्हणाले. भारत सरकार विविध उपायांद्वारे निदान आणि उपचाराच्या वेगाचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यात मॉल्युक्युलर चाचण्यांद्वारे विनामूल्य निदानऔषधांच्या परिणामांची माहितीक्षयरोगाने ग्रस्त असलेल्या सर्व लोकांना मोफत उपचारउत्कृष्ट प्रतीची औषधे आणि उपचार पद्धती याविषयी माहिती प्रदान करते. रूग्णांना आर्थिक आणि पौष्टिक आहाराबाबत सहाय्यखाजगी क्षेत्राचा मदतीसाठी सहभाग वाढावा यासाठी प्रयत्नअधिसूचनांची माहिती मिळावी आणि त्यांचे योग्य पालन व्हावे यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर. अशासकीय संस्थांशी संपर्क साधणेयासह अनेक पावलांचा समावेश आहे  क्षयमुक्त जगासाठी पुढाकार घेऊन भारत पुढे वाटचाल करेलअसेही ते म्हणाले.

सन 2025 पर्यंत हे उद्दीष्ट साध्य राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या राष्ट्रीय धोरण आराखड्याविषयी त्यांनी माहिती दिली. या माध्यमातून क्षयरोगाचे प्रमाण आणि मृत्यूदर झपाट्याने कमी करण्यासाठी आक्रमक धोरणे आखली आहेत. एनटीईपीने खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी रुग्णांना पाठबळ देणाऱ्या संस्थांबरोबर करार करणेराष्ट्रीयराज्य आणि जिल्हा पातळीवरील क्षयरोग निर्मूलनासाठी काम करणाऱ्या व्यासपीठांच्या माध्यमातून सामुदायिक सहभाग वाढवणे आणि आरोग्य यंत्रणेतील सर्व स्तरांवर क्षयरोग सेवांना एकत्रित करणे यासारखे अनेक नवे उपाय योजले आहेत. आयुष्मान भारत योजने अंतर्गतही संबंधित केन्द्रांमधे क्षयरोगाला सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेचा आवश्यक भाग बनवण्यात आला आहे.

प्रत्येक नागरिकाने क्षयरोगाविरोधात एकत्रितपणे लढा द्यायला हवाक्षयरोगाला केवळ जैववैद्यकिय रोग म्हणूनच नव्हे तर सामाजिक रोग म्हणूनही विचार करत त्याचे उच्चाटन करण्याचे आवाहन डॉ. हर्ष वर्धन यांनी केले.  टीबी हारेगा देश जीतेगा या घोषणेसह2025 पर्यंत सर्व क्षेत्रातील सहभागी घटक आणि सहकाऱ्यांच्या साथीने क्षयरोगाचे निर्मूलन केले जाईल असा विश्वास व्यक्त करुन डॉ. हर्ष वर्धन यांनी आपल्या भाषणाचा सकारात्मक समारोप केला. त्यांनी भारत क्षयरोग परिषदेला यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News