दौंड शहरात कोरोनाचा कहर थांबेना आज 138 पैकी 46 जण पॉझिटिव्ह,


दौंड शहरात कोरोनाचा कहर थांबेना आज 138 पैकी 46 जण पॉझिटिव्ह,

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड शहर आणि परिसरात  रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने या रोगाला आवर घालने आरोग्य विभाग आणि प्रशासनाला जिकिरीचे होणार आहे, गर्दीवर नियंत्रण आणणे हे गरजेचे आहे, मागील वर्षीपेक्षा या वर्षी कोरोनाचा विळखा अजूनच घट्ट होत चालला आहे, शुक्रवार दिनांक 19 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय येथे 138 जणांचे अँटी जेन  तपासणी करण्यात आली होती यामध्ये 46 जण पॉझिटिव्ह आले असून 24 पुरुष तर 22 महिलांचा या रुग्णांमध्ये समावेश आहे, दौंड शहरातील 25 रुग्ण आहेत तर दौंड शहराच्या ग्रामीण परिसरातील 21 रुग्ण असल्याचे दौंड उप जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, रुग्णाची दवाखान्यात सोय होत नसल्यामुळे बरेच रुग्ण घरी जात  असल्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे संपर्कात येणारे लोक हे नवीन  रुग्ण येत असल्याने झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे तोंड शहर आणि परिसरात याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, दौंड पोलीस प्रशासन वीना मास्क फिरणारा वर कारवाई करत आहे परंतु विना मास्क दुकानदार, भाजी विक्रेते यांच्यावर नगरपालिकेकडून कारवाई होताना दिसत नाहीत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News