विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
- दौंड शहरासाठी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मयूर भुजबळ यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी वाळू माफिया वर कारवाई करून त्यांचा इरादा स्पष्ट केला आहे,मयूर भुजबळ यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून वाळू माफिया वर जोरदार कारवाई केली आहे, 8 ब्रास वाळू सह 27 लाख 54 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त, चालका- मालका विरोधात चोरीचा गुन्हा दाखल, करून प्रो.उपविभागिय पोलीस अधिकारी मयुर भुजबळ यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे, दौंड तालुक्यातील वाटलुज गावातील भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करताना ट्रक नंबर MH- 12-HD 4657 व डंपर नंबर MH-42-T-7779 गाड्या अवैध वाळू वाहतूक करतांना तसेच त्यामधील 8 ब्रास वाळु सह मिळून आल्याने पो.हवा. सुनील सस्ते यांच्या फिर्यादीवरून या गाड्या सह वाळू चोर गणेश सावंत,मालक शेळके व चालक काळे यांच्यावर दौंड पोलीस स्टेशन येथे वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे,या जप्त केलेल्या वाहनांसह वाळूची किंमत 27 लाख 54 हजार रुपये इतकी आहे,ही कारवाई प्रो.उपविभागिय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ,पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे,DB पथकाचे सर्व पोलिस कर्मचारी, होमगार्ड चोरमले आदींनी ही कारवाई केली आहे,या कारवाईमुळे वाळु माफियांना चांगलाच दणका बसला आहे.