लेबर ब्युरो आणि ब्रॉडकास्ट इंजिनयरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्यामध्ये भारतभरातील सर्वेक्षणाबाबत सेवाकरार


लेबर ब्युरो आणि ब्रॉडकास्ट इंजिनयरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्यामध्ये भारतभरातील सर्वेक्षणाबाबत सेवाकरार

श्रम आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न असलेला लेबर ब्युरो हा विभाग आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ब्रॉडकास्ट इंजिनयरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) ही भारत सरकारची कंपनी यांच्यामध्ये सर्वेक्षणासंबधी सेवा करार झाला. या करारान्वये संपूर्ण देशभरातील स्थलांतरीत कामगार सर्वेक्षण व उपक्रमाधारित तिमाही रोजगार सर्वेक्षण (AQEES) यासाठी लेबर ब्युरोला आता BECIL  कडून तंत्रज्ञानाधारित सेवा व मनुष्यबळाचे सहाय्य मिळेल.श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष कुमार गंगवार  तसेच  सचिव अपूर्वा चंद्रा यांच्या उपस्थितीत  लेबर ब्युरोचे व्यवस्थापकीय संचालक डी पी एस नेगी व BECIL चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज  कुरूविल्ले यांनी या सेवा करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या करारामुळे माहिती-तंत्रज्ञानाधारीत सर्वेक्षणाचे नवीन युग सुरू झाले आहे. ब्युरो हाती घेणार असलेले सर्वेक्षण आता बेसिल ने पुरविलेल्या तंत्रज्ञानाने केले जाईल त्यामुळे या सर्वेक्षणांसाठी लागणारा वेळ तीस ते चाळीस टक्क्यांनी वाचेल. मंत्रालयाने निश्चित कालावधी रोजगार’ हा नवीन रोजगार स्तर जारी करत त्या आधारे या सर्वेक्षणाला सहाय्य करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान भागीदार पुरविणार असलेल्या मनुष्यबळाला त्या ठराविक मुदतीसाठी निश्चित रोजगार देण्याचे निश्चित केले आहे. नवीन सुधारित श्रम- कायद्यांमध्ये निश्चित कालावधी रोजगार’ ही ऐतिहासिक तरतूद असून त्यामुळे निश्चितकालीन रोजगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगारांसारखेच विविध लाभ मिळतील.

या कराराबद्दल समाधान व्यक्त करताना संतोष गंगवार यांनीअशी सर्वेक्षणे अतिशय उपयुक्त आणि परिवर्तनक्षम असतातयामुळे सरकारला स्थलांतरीत कामगार व औपचारीक तसेच अनौपचारीक आस्थापनांमधील रोजगार यांचा डेटा उपलब्ध होईल. ब्युरोने अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वेक्षणासाठी वापरण्याचे ठरवल्याने वेळेवर आणि जलदगतीने आकडेवारी हाती येईल  असा विश्वास व्यक्त केला

कोणत्याही डेटाबेसची विश्वासार्हता ही नेमकेपणा आणि वेळेवर तो उपलब्ध होणे यावर अवलंबून असते. ब्युरोतंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या या सर्वेक्षणात गोळा झालेल्या माहितीबाबत माहितीचे नेमकेपण व वेळवर तिची उपलब्धता या दोन्ही कसोट्यां पार करेलअसे श्रम व रोजगार सचिव अपूर्वा चंद्रा यांनी नमूद केले.

आपली आस्थापना दिलेले सर्वेक्षणाचे काम वेळेवर आणि दर्जात्मक करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही असा विश्वास BECIL (माहिती व तंत्रज्ञान खात्याची मिनीरत्न कंपनी) चे जॉर्ज कुरुविले यांनी श्रम व रोजगार मंत्रीश्रम व रोजगार सचिवलेबर ब्युरोचे व्यवस्थापकीय संचालक व मंत्रालयातील इतर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना दिला.

या प्रसंगी बोलताना लेबर ब्युरोचे व्यवस्थापकीय संचालक डी पी एस नेगी यांनी अश्य़ा प्रकारे उपक्रमाने हाती घेतलेला माहिती तंत्रज्ञानाधारित मोठ्या प्रमाणावरील असे हे पहिलेच सर्वेक्षण असल्याचे नमूद केले.  यावर्षी ब्युरो अखिल भारतीय स्तरावरील स्थलांतरीत कामगारघरकामगार, AQEES, व्यावसायिकांमुळे उद्याला आलेले तसेच वाहतूक क्षेत्रातील रोजगार यावर एकूण पाच सर्वेक्षणे जारी करेल व पूर्णत्वाला नेईल. या अखिल भारतीय पातळीवरील सर्वेक्षणामुळे रोजगारसंबधी तसेच कामगारांच्या भल्यासाठीचे धोरण आखण्याच्या दृष्टीने भरपूर माहिती उपलब्ध होईलअसेही त्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News