केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जम्मू-काश्मीर रस्ते प्रकल्पांच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.


केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जम्मू-काश्मीर रस्ते प्रकल्पांच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

कथुआ आणि दोडा जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रस्तावित छत्तरगला बोगद्याचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी निधी वाटपाच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीनितीन गडकरी यांची भेट घेतली. हा बोगदा बासोली-बानी मार्गे भादरवाह आणि दोडा ला जाण्यासाठी नवीन महामार्ग तयार करेल. हा एक ऐतिहासिक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे जो दोन दूरच्या प्रदेशांदरम्यान बारमाही पर्यायी रस्ता जोडणी प्रदान करेल आणि दोडा ते लखनपूर दरम्यानचा प्रवासाचा अवधी सुमारे चार तासांचा बनवेल.छत्तरगला प्रकल्पात 6.8 कि.मी. लांब बोगद्याची कल्पना केली गेली असून त्यासाठी सीमा रस्ते संघटनेद्वारे (बीआरओ) व्यवहार्यता सर्वेक्षण यापूर्वीच केले गेले आहे. अंमलबजावणीचे काम सुरू झाल्यानंतर या बोगद्याचे काम पूर्ण होण्यास सुमारे 4 वर्षे लागण्याची शक्यता असून या बांधकामासाठी सुमारे 3,000 कोटी रुपये खर्च येणार आहे.

सीमा रस्ते संघटनेला काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने डॉ. जितेंद्रसिंग यांनी गडकरी यांची भेट घेतली आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून भारतमाला किंवा इतर कोणत्याही योग्य मार्गाने बीआरओला आर्थिक मदतीची विनंती केली. यावर गडकरींचा प्रतिसाद सकारात्मक होता आणि हे उत्तम प्रकारे कसे करता येईल यावर काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News