देहविक्रय करणाऱ्यांच्या (सेक्स वर्कर्स) पुनर्वसनाचे धोरण


देहविक्रय करणाऱ्यांच्या (सेक्स वर्कर्स) पुनर्वसनाचे धोरण

महिला आणि बालविकास मंत्रालय उज्ज्वला योजनेची अंमलबजावणी करते.  व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या हेतूने केलेल्या तस्करीला आळा घालणे आणि तस्करी पीडितांचे बचावपुनर्वसन आणि पुन्हा मुख्य प्रवाहात आणणारी ही व्यापक योजना आहे. संरक्षणात्मक आणि पुनर्वसनगृहांमध्ये अन्नवस्त्रवैद्यकीय सेवाकायदेशीर मदतसुटका केलेल्या मुलांसाठी शिक्षण आणि त्यांना रोजगाराचा  पर्याय उपलब्ध करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण या मूलभूत सुविधा पुरवल्या जातात.

महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News