महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये दैनंदिन नवीन रुग्ण संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ कायम


महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये दैनंदिन नवीन रुग्ण संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ कायम

न्यूज नेटवर्क, 19/03/2021

देशातील वाढत्या कोविड-19 रुग्ण संख्येवर केंद्र सरकार राज्य / केंद्रशासित प्रदेशांसोबत समन्वय साधून बारकाईने नजर ठेवून आहे

कोविड लसीचे सुमारे 4 कोटी डोस दिले

देशातील काही राज्यांमध्ये नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे. नव्या रुग्णांपैकी 80.63% रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक,गुजरात, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील आहेत. गेल्या 24 तासांत 39,726 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.   देशभरात नव्या प्रतिदिन नोंदल्या गेलेल्या रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 65% म्हणजे 25,833 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पंजाब मध्ये 2,369 आणि केरळमध्ये 1899 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

 

खाली दर्शविल्याप्रमाणे, देशातील आठ राज्यांमध्ये दैनंदिन पातळीवर नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड रुग्णांच्या संख्येचा आलेख सतत चढता राहिला आहे.

 

केंद्र सरकार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विशेषतः जिथे दैनंदिन रुग्ण संख्येत निरंतर वाढ निदर्शनाला येत आहे त्यांच्याशी सक्रीय समन्वय साधत आहे. केंद्र सरकार त्यांच्याबरोबर कोविड नियंत्रणाची स्थिती व सार्वजनिक आरोग्याच्या उपायांचा नियमितपणे आढावा घेत आहे.

महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये अलीकडे वाढत असलेली कोविडच्या रुग्णाची संख्या लक्षात घेता कोविड-19 नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपायांना सहाय्य करण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र व पंजाब येथे उच्चस्तरीय सार्वजनिक आरोग्य पथके नियुक्त केली आहेत. याआधी केंद्र सरकारने कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात राज्यांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर येथे उच्चस्तरीय पथके नियुक्ती केली होती.  पुढील पाठपुरावा कारवाईसाठी केंद्रीय पथकांचे अहवाल राज्यांसमवेत सामायिक केले जातात. 

आतापर्यंतच्या देशभरातील एकूण कोविड रुग्णांच्या संख्येच्या 2.82% म्हणजे 2.71लाख  (2,71,282)  सक्रीय कोविड रुग्ण सध्या देशात आहेत गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णांमधून 18,918 रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 76.48% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News