दौंड उपजिल्हा रुग्णालयात आजपर्यंतचा कोरोना रुग्णांचा उच्चांक, चार दिवसात शंभरी पार


दौंड उपजिल्हा रुग्णालयात आजपर्यंतचा कोरोना रुग्णांचा उच्चांक, चार दिवसात शंभरी पार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी 

लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, दौंड उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उच्चांक झाला आहे, एकाच दिवसात तब्बल 43 जण पॉझिटिव आले आहेत, तर दौंड शहरात चार दिवसात शंभरच्यावर रुग्ण मिळाले आहेत, दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 18 मार्च रोजी 111 लोकांची अँटी जेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल 43 जण पॉझिटिव्ह आले आहेत त्यात 26 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश आहे, दौंड शहरातील 26 रुग्ण असून दौंड शहर परिसरातील ग्रामीण भागात 18 रुग्ण असल्याचे डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, मागील वर्षीपेक्षा या वर्षी कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे परंतु ना जनता ना प्रशासन यावर गांभीर्याने विचार करताना दिसत आहे, व्यवसायिक विना मास्क विक्री करत आहेत, ग्राहकही विना मास्क खरेदीसाठी गर्दी करत आहेत, कोविड सेंटर बंद असल्यामुळे सर्व रुग्ण आपआपल्या घरी जात आहेत आणि त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, याकडे प्रशासन गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News