सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी भारतीय रेल्वेने , 1107 पैकी 815 पूल /रस्त्यावरील पूल / पादचारी पुलांचे त्रयस्थ पक्षाकडून परीक्षण पूर्ण केले


सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी भारतीय रेल्वेने , 1107 पैकी 815 पूल /रस्त्यावरील पूल / पादचारी पुलांचे त्रयस्थ पक्षाकडून परीक्षण पूर्ण केले

भारतीय रेल्वेने आपल्या पुलांचे त्रयस्थ पक्षाद्वारे मोठ्या प्रमाणात परीक्षण केले आहे

त्रयस्थ पक्षाकडून होणाऱ्या परीक्षणाने भारतीय रेल्वेच्या पूल, रस्त्यावरील पूल आणि पादचारी पुलांची देखभाल आणि दुरुस्तीत पारदर्शकता आणली आहे

नवी दिल्‍ली, 18 मार्च 2021, देशभरात रेल्वेमार्गांवर भारतीय रेल्वेचे 1,50,390 पुलांचे विस्तृत जाळे आहे. याव्यतिरिक्त, रस्त्यांवरून सुलभरीत्या रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी रस्त्यांवरील 3449  पूल उपलब्ध करून दिले आहेत. प्रवाशांसाठी / पादचाऱ्यांना रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी, रेल्वेनें 3771 पादचारी पूल जनता / रेल्वेच्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले आहेत..  01.04.2020 पर्यंत

भारतीय रेल्वेद्वारे नियोजित वेळापत्रकानुसार, स्थिरस्थावर असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून,नियुक्त केलेल्या अधिकार्यांद्वारे  पूल,/रस्त्यावरील पूल / पादचारी पुलांची वार्षिक देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. विद्यमान पायाभूत सुविधांबद्दल   अधिक विश्वास आणि विश्वासार्हता स्थापित करण्यासाठी, गंभीर स्थिती असलेले  पूल,/रस्त्यावरील पूल / पादचारी पुलांची  स्थिती ओळखण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांच्या मतानुसार , त्रयस्थ पक्षाकडून परीक्षण करण्याचे 2018 मध्ये  ठरविण्यात आले. तज्ज्ञ संस्थांद्वारे केल्या जाणाऱ्या त्रयस्थ पक्षाच्या परीक्षणाचा उद्देश  धूपप्रवण भागात प्रतिकूल परिणाम करणाऱ्या गंभीर घटकांचे बारकाईने  परीक्षण करणे हा आहे.

आयआयटी, एनआयटी, एसईआरसी इत्यादी तज्ज्ञ संस्थांद्वारे,गंभीर स्थिती असलेले  पूल,/रस्त्यावरील पूल / पादचारी पुलांचे परीक्षण  केले जात आहे. पुलाच्या  विविध पैलूंचे  (भक्कमपणाचे मूल्यांकन यात एनडीटी चाचणी ,सध्याचा भार पेलण्यासाठीची आरेखन आवश्यकता, भौतिक स्थिती इत्यादी आवश्यक गोष्टींचा समावेश) राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे  एक वेळ त्रयस्थ पक्षाकडून तांत्रिक परीक्षण करण्याच्या सूचना विभागीय रेल्वेला देण्यात आल्या. पुढील प्राधान्यक्रमानुसार पुलांचे त्रयस्थ पक्षद्वारे परीक्षण करण्यात आले :

  1. सर्व मोठे पूल ,ओआरएन 1 मानांकित  रेल्वे पूल , रस्त्यावरील पूल / पादचारी पूल.
  2. ओआरएन 2 मानांकित रेल्वे पूल आणि वेगाचे निर्बंध असलेले पूल
  3. 80 वर्षांपेक्षा अधिक जुने सर्व महत्वाचे पूल
  4. रेल्वेच्या दृष्टिकोनातून गंभीर मानण्यात आलेले अन्य सर्व पूल 

त्रयस्थ पक्षाकडून करण्यात आलेल्या परीक्षणाचा मोठा फायदा असा झाला की, मुंबई परिसरात रस्त्यावरील 49 पूल जीर्ण परिस्थितीत आढळून आले. यापैकी  43 रस्त्यावरील पुलांची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात आली आणि बांधकाम कोसळलेले 6 पूल बंद करण्यात आले असून त्यांची पुनर्बांधणी सुरु आहे.

त्याचप्रमाणे , 127 पादचारी पूल जीर्ण अवस्थेत आढळून आले. यापैकी 95 पादचारी पुलांची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात आली आणि  32 पूल बंद करून हे पूल पुन्हा तयार करण्यासाठी पाडण्यात आले . 20 पादचारी पुलांची पुनर्बांधणी पूर्ण झाली असून 12 पादचारी पुलांची पुनर्बांधणी सुरु आहे.

1107 पूल / रस्त्यावरील पूल / पादचारी पूल  यापैकी 815  पूल / रस्त्यावरील पूल / पादचारी पुलांचे  त्रयस्थ पक्षाकडून परीक्षण पूर्ण झाले असून संबंधित  कामे प्रगतीपथावर आहेत.   संपूर्ण यंत्रणा पारदर्शक करण्यासाठी ,सर्व रस्त्यावरील पूल आणि पादचारी पुलांवर  कामाचा तपशील सांगणारे फलक उपलब्ध करून दिले आहेत. रेल्वे पुलांच्या संदर्भात , सर्व रेल्वे स्थानकांवर मुख्य फलाटावर  सोयीस्कर ठिकाणी फलक  लावण्यात आले आहेत.

वापरकर्त्यांमध्ये पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि विश्वासार्ह रेल्वे पायाभूत सुविधा स्थापन करण्याच्या  दृष्टीने, वेब आधारित रेल्वे पूल व्यवस्थापन यंत्रणेवर  ( आय आर बी एम एस ) टाकण्यात आलेल्या छायाचित्रांचे फलक  रस्त्यावरील पूल  / पादचारी पुलांवर आणि सर्व स्थानकांवर लावण्यात आले आहेत , ते  रेल द्रिष्टी या संकेतस्थळाशी जोडण्यात आले असून कोणत्याही  व्यक्तीला   www.raildrishti.in या संकेस्थळावर हे छायाचित्र असलेले फलक बघता येतील. याप्रमाणे : मुख्य माहिती → कामगिरी निर्देशांक → पूल तपासणी  → तपासणी छायाचित्र असलेले फलक .

रेल्वे अधिकारयांच्या ई द्रिष्टी संकेतस्थळावरून ही छायाचित्रे  पाहता येतील. www.edrishti.cris.org.in →  कार्यप्रणाली  → पूल तपासणी  → तपासणी छायाचित्र असलेले फलक

आय आर बी एम एस  यंत्रणेवर 11600 छायाचित्रे सामावून घेण्याची व्याप्ती असून विविध विभागणी आतापर्यंत  10,363 छायाचित्रे टाकली आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News