पाच वर्षाच्या बाळासह 55 जण पॉझिटिव्ह,रुग्ण संख्येत वाढ धोकादायक


पाच वर्षाच्या बाळासह 55 जण पॉझिटिव्ह,रुग्ण संख्येत वाढ धोकादायक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

- दौंड शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ही बाब धोकादायक असून गांभीर्याने घेणे काळाची गरज निर्माण झाली आहे, आज दौंड शहर आणि परिसरात 31 रुग्ण सापडले आहेत तर दौंड तालुक्यातील इतर गावांमध्ये 24 रुग्ण सापडले आहेत, त्यामध्ये केडगाव, यवत, कुरकुभ, गोपाळवाडी, कासुर्डी, नाथाची वाडी, पारगाव, कानगाव, आलेगाव, नानविज, लिंगाळी, वाळकी आणि बोरीऐंदी या गावांमध्ये रुग्ण वाढत आहे, ग्रामीण भागातील जनतेने स्वतःपासून काळजी घेणे गरजेचे आहे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, विना मास्क फिरू नये,लग्न समारंभ, अंत्यविधी या ठिकाणी जाणे टाळावे ही दक्षता जनतेने घ्यायलाच पाहिजे असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी व्यक्त केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News