राज्यसभेने 16 मार्च 2021 रोजी वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 मध्ये सुधारणा करणाऱ्या वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) विधेयक 2021 ला मान्यता दिली. हे विधेयक लोकसभेत 17 मार्च 2020 रोजी संमत झाले होते.
विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये:
वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) विधेयक 2021 हे महिलांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात सेवेचा विस्तार करण्यासाठी, उपचारात्मक,मानवी आणि सामाजिक आधारावर आणण्यात येत आहे.
कठोर अटींखाली सेवा आणि सुरक्षित गर्भपात गुणवत्तेशी तडजोड न करता काही परिस्थितीत गर्भपाताची कमाल मर्यादा वाढवण्यासाठी तसेच गर्भपात सेवेतील सर्वसमावेशक प्रवेश मजबूत करण्याच्या उद्देशाने या अटींमध्ये काही उप-कलमांना पर्यायी कलमे देणे, सध्याच्या वैद्यकीय गर्भपात कायदा 1971मधील काही कलमांतर्गत काही नवीन कलमे समाविष्ट करणे यांचा समावेश आहे.
महिलांची सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे ठोस पाउल असून त्याचा अनेक महिलांना लाभ होईल. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारामुळे होणाऱ्या गर्भधारणा किंवा गर्भाच्या विकृतीच्या कारणास्तव सध्याच्या गर्भपाताची कमाल मर्यादा वाढविण्याबाबत अलीकडेच न्यायालयाला अनेक याचिका प्राप्त झाल्या आहेत. या सुधारणांमुळे महिलांना सुरक्षित गर्भपात सेवेची महत्वाकांक्षा व प्रवेश वाढेल आणि ज्या महिलांना गर्भपाताची आवश्यकता आहे त्यांना सन्मान, स्वायत्तता, गोपनीयता आणि न्याय मिळेल.