भारतीय रेल्वेमध्ये धुक्यात मार्ग दाखवणारे उपकरण उपलब्ध


भारतीय रेल्वेमध्ये धुक्यात मार्ग दाखवणारे उपकरण उपलब्ध

धुके असलेल्या भागात मार्ग दाखवणारे सहजी हाताळता येईल असे उपकरण लोको पायलट्सना भारतीय रेल्वेने उपलब्ध करुन दिले आहे. हे जीपीएस आधारीत कुठेही नेता येईल असे पोर्टेबल उपकरण असून हाताळायला सोपे आहे. धुके असलेल्या भागातून गाडी जाताना सिग्नल यंत्रणालेव्हल क्रॉसिंग गेट्स इत्यादींची हे  उपकरण दृकश्राव्य माध्यमातून सूचना देते. 01-03-2021 पर्यंत अशाप्रकारची 12 हजार 742 धुक्यात दिशा दाखवणारी उपकरणे भारतीय रेल्वेसेवेत उपलब्ध करण्यात आली आहेत.

ही माहिती रेल्वेवाणिज्य आणि उद्योग व ग्राहक व्यवहारअन्न व सार्वजनिक वितरण मंत्री श्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News