"एकता मंच" या स्वयंसेवी संस्थेद्वारे नुक्कड नाटक "कोरोना मुक्त समाज" चे यशस्वी आयोजन


"एकता मंच" या स्वयंसेवी संस्थेद्वारे नुक्कड नाटक "कोरोना मुक्त समाज" चे यशस्वी आयोजन

मुंबई ; लोकांमध्ये कोरोनाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठीतसेच या मुद्यावर सरकारला मदत व्हावी या उद्देश्याने "एकता मंच" या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अजय कौल अख्ख्या मुंबईत नुक्कड नाटक आयोजित करून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत कीकोरोना ही महामारी गांभीर्याने घ्यात्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच तो पुन्हा वाढू लागला आहेत्यामुळे सतर्क राहा आणि सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा. "कोरोना मुक्त समाजया नुक्कड नाटकाचा पहिला प्रयोग १६ मार्च २०२१ रोजी अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला येथील गार्डनजवळ ठेवण्यात आला होतातो यशस्वीपणे पार पडलायावेळी अजय कौलवेस्टर्न रिजनचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिकवर्सोव्हाचे वरिष्ठ इंस्पेक्टर सिराज इनामदारनगरसेविका प्रतिमा खोपडेडीएननगरचे वरिष्ठ इंस्पेक्टर गायकवाडप्रशांत काशिद वगैरे उपस्थित होतेत्यांनीही लोकांना कोरोनाप्रती सतर्क राहण्याचे आवाहन केले.

   महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाच्या कलाकारांनी  "कोरोना मुक्त समाजहे नुक्कड नाटक केलेया नाटकात सांगण्यात आले कीकुटुंबातील एक व्यक्ती जरी कोरोनामुळे मृत्युमुखी पडला किंवा या आजाराने त्रस्त झाला तरी पूर्ण कुटुंब संकटात सापडते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी कोरोनाविरोधात कारवाई करताना खूप चांगली पावले उचलली आहेतआपली जबाबदारी ते चांगली सांभाळत आहेतजनतेनेही कोरोना विरोधात आपली जबाबदारी ओळखून सरकारला मदत करायला हवी.

               याप्रसंगी बोलताना अजय कौल यांनी सांगितले कीसरकारमधील लोक म्हणजेच मंत्रीनेतापोलीसडॉक्टरमहापालिकेचे कर्मचारी हे जनतेच्या भल्यासाठी काम करत आहेतत्यांना आपण पूर्ण सहकार्य केले पाहिजे.यावेळी बोलताना चिल्ड्रन वेलफेयर सेंटर हायस्कुलचे एक्टिव्हिटी चेयरमन प्रशांत काशिद म्हणाले कीकारण नसताना लोकांनी उगीचच बाहेर फिरू नयेफेरफटका मारायचाच असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर सरकारी नियमांचे पालन करत लोकांनी मास्क वापरणेसोशल डिस्टन्स पाळणेवारंवार हात धुणे अशा नियमांचे पालन केले तरच कोरोना आटोक्यात राहू शकेल.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News