शिरूरला शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान
गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी:
शिरूर नगरपरिषदेची आगामी निवडणुक शिवसेनेच्यावतीने स्वबळावर लढण्यात येणार असुन त्यादृष्टीने तयारीला लागुन शिवसैनिकांनी सरकारच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवुन त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी केले.
शिरूर नगरपरिषदेजवळील शिवसेवा मंदिराजवळ शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी युवा सेना शहर अधिकारी सुनील जाधव,शिवसेनेचे शिरूर तालुका संघटक राजेंद्र शिंदे,नगरसेवक मंगेश खांडरे,निलेश गाडेकर,माजी शहरप्रमुख बलराज मल्लाव,मंगेश कवाष्टे,निलेश गवळी,स्वप्निल रेड्डी,सुनील जठार,संपत दसगुडे,साई परदेशी,बाबु पुजारी,राजेंद्र चोपडा,आकाश चौरे,विकी उमाप,दत्तू शिंगोटे,ऋषिकेश शितोळे,पोपट ढवळे,आकाश क्षिरसागर,सिध्दांत चव्हाण, यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना सदस्य नोंदणी दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या हस्ते शिवसैनिकांच्या हातात शिवबंधन बांधण्यात आले.