भारतीय मजदूर संघाची पेंशन वाढी करिता ई पी एफ कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन      


भारतीय मजदूर संघाची पेंशन वाढी करिता ई पी एफ कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन      

सुरेश बागल कुरकुंभ प्रतिनिधी:

  ई पी एफ ९५ पेंशन योजना तील पेंशन  वाढ होण्याकरिता समिती स्थापन करण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी केली आहे. या वेळी भारतीय मजदूर संघाने भविष्य निर्वाह निधी कार्यालय पुणे येथे धरणा आंदोलन करून निवेदन दिले आहे.                               समिती चा अहवाल येत पर्यंत किमान रू५००० / व महागाई भत्ता देण्याची मागणी केली आहे.  १/१/२००४ पासून नवीन पेंशन सिस्टीम N P S लागु केली या मध्ये १०%रक्कम कामगार व सरकार चे अंशदान असायचे.  या २०%अंशदान च्या ६०% रक्कम सेवानिवृत्त नंतर कामगारांना मिळेल. व बाकी रकमेतून बाजारमुल्या नुसार पेंशन मिळेल अशी तरतूद आहे. नुकतेच सरकारने ४% अंशदान वाढवून १४% केलं आहे. १९९५ पेंशन योजना नुसार किमान पेंशन १००० रू केली आहे.  असंघटीत कामगारक्षेत्र करिता ६०वर्ष पेक्षा जास्त झालेल्या कामगारांना किमान पेंशन ३००० रू केली आहे.  वृध्दापकाळात ही रक्कम अतिशय  असते.  त्यामुळे भारतीय मजदूर संघ ने मागणी केली आहे की कामगारांच्या शेवटच्या पगाराच्या ५०%रक्कम पेंशन म्हणून दरमहा देण्यात यावे  . 

भारतीय मजदूर संघाच्या महत्वपूर्ण मागण्या

 १) पेंशन वाढ व सुधारणा करिता त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात यावी. अवहाल मिळे किमान  र ५००० , व महागाई भत्ता मिळावा.  

२) सर्व पेंशन योजना मध्ये सरकार चे अंशदान सारखं असावे 3) पेंशन योजनांना  बदलता महागाई भत्ता लागु करावा. 

४) सर्व कामगारांना त्यांच्या शेवटचा वेतन च्या ५०% रक्कम सेवानिवृत्त नंतर मिळावी. 

५) सरकारी कर्मचारी ना जुन्या पेंशन योजना लागु करण्यात यावी. 

६)बॅक, विमा अन्य कर्मचारी पेंशन योजनांचा वेळोवेळी पुनःनिराधरण करण्यात यावे. 

असंघटीत कामगारांना करिता चांगली  पेंशन योजना करण्यात यावी. 

७) सामाजीक सुरक्षा मुलभुत अधिकारात समाविष्ट करून पेंशन योजना करण्यात यावी.  

या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या  मागण्यां चे  निवेदन मा अरूण कुमार  रिजनल  कमिशनर १ भविष्य निर्वाह निधी कार्यालय पुणे  यांना दिले आहे. या वेळी  चिटणीस जालिंदर कांबळे,  अर्जुन चव्हाण, उमेश विस्वाद, विवेक ठकार, अजेंद्र जोशी, वासंती तुम्मा,  विजयालक्ष्मी येमुल सहभागी झाले होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News