दौंड शहरात कोरोना ॲक्टिव मोडवर,नगरपालिका सायलेंट मोडवर 11 वर्षाच्या मुलासह एका घरातील 7जण पॉझिटिव


दौंड शहरात कोरोना ॲक्टिव मोडवर,नगरपालिका सायलेंट मोडवर 11 वर्षाच्या मुलासह एका घरातील 7जण पॉझिटिव

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 दौंड शहरासह तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असताना दौंड नगरपालिका मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही, काल शहरातील 21 रुग्ण होते तर आज 16 रुग्ण शहरातील आहेत, कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दौंड नगरपालिका मात्र सायलेंट मोडवर असल्याचे दिसत आहे, शहरात कुठलेही  प्रकारची कारवाई होताना दिसत नाही,ज्या भागात रुग्ण सापडले आहे त्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र करणे, औषध फवारणी करणे अशी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही,तर ग्रामीण भागातही तीच परिस्थिती सध्या सुरू आहे, दौंड तालुक्यात सर्व ग्रामपंचायत निवडणुका झाल्यामुळे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य अजून कारवाई करताना दिसत नाहीत, ही चिंतेची बाब आहे, दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 16 मार्च रोजी 110 लोकांच्या अँटी जेण तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल 37 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामध्ये 24 पुरुष तर 13 महिलांचा समावेश आहे,दौंड शहरातील 16 रुग्ण असून ग्रामीण भागातील 21 रुग्ण असल्याचे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात एकूण 26 रुग्ण असल्याचे दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी सांगितले आहे, यवत केडगाव पाटस बेटवाडी गार कुरकुभ लिंगाळी मोरेवस्ती मळत राहू या ठिकाणी रुग्ण आले आहेत,दौंड उपजिल्हा रुग्णालयात फक्त 40 बेड असून त्यामध्ये 10 बेड हे ऑपरेशन आणि डिलिव्हरी महिलांसाठी राखीव असून कोरोना रुग्णांसाठी 30 बेड शिल्लक असल्याचे डॉ डांगे यांनी सांगितले,तर कोविंड सेंटरसाठी अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे सेंटरला रुग्ण ऍडमिट करता येत नाहीत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News