मनसेच्या उपशहर अध्यक्षपदी प्रशांत कनोजिया यांची निवड


मनसेच्या उपशहर अध्यक्षपदी प्रशांत कनोजिया यांची निवड

पुणे प्रतिनिधी /सागरराज बोदगिरे:

पुणे महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या पुणे शहर उपअध्यक्षपदी प्रशांत कनोजिया यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. नुकतेच मनसेचे शहरप्रमुख वसंत मोरे यांनी प्रशांत कनोजिया यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी बाबू वागस्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

विद्यार्थी चळवळीत सदैव अग्रेसर असणारे प्रशांत कनोजिया यांनी मनसेत मनविसे विभाग अध्यक्ष,शहर अध्यक्ष पुणे ,पुणे जिल्हा अध्यक्ष मनसे -सचिव ,शहर मनसे-मनविसे समन्वयक,शहर उपाध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्ते असणाऱ्या कनोजिया यांनी विविध आंदोलनाद्वारे पक्षाची ताकद वाढवली आहे. नागरिकांच्या हितासाठी अनेक वेळा आंदोलन करणाऱ्या प्रशांत कनोजिया यांची  आक्रमक चेहरा व अभ्यासू  म्हणून   आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी निवड   करण्यात आली आहे. या निवडीबद्दल कनोजिया म्हणाले,  आजचे राजकीय पक्ष कधीही कुणाशी  युती करतात , महाआघाडी करतात  पण जनतेच्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष होते. जनतेच्या हितासाठीच मनसे कटिबद्ध आहे आणि एक सक्षम पर्याय आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडताना समाजाभिमुख कार्यालाच सदैव प्राधान्य राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कनोजिया हे हेल्प रायडर या चळवळीचे संस्थापकही आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News