दौंड शहरासह,तालुकाच बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, एका दिवसात 52 पॉझिटिव्ह, प्रशासनाकडून कारवाईची गरज


दौंड शहरासह,तालुकाच बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, एका दिवसात 52 पॉझिटिव्ह, प्रशासनाकडून कारवाईची गरज

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड शहरासह पूर्ण तालुकाच कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे, आता प्रशासनानेच कडक पावले उचलून कारवाई करण्याची गरज आहे, उपजिल्हा रुग्णालय येथे 38 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत तर दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात चौदा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत,हा आकडा भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाची नांदी आहे प्रशासनासह सर्वसामान्य जनतेने सावध होण्याची वेळ आली आहे,मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 58 रुग्ण होते दुसऱ्या आठवड्यात तीन दिवसात 51 रुग्ण होते तर आज तिसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी 52 रुग्ण सापडल्याने कोरोना विषयी गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे, दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे सोमवार दिनांक 15 मार्च रोजी 131 जणांची अँटीजेण तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल 38 जण पॉझिटिव्ह आले आहे, या रुग्णांमध्ये 22 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश आहे, दौंड शहरातील 21 रुग्ण आहेत तर दौंड परिसरातील 17 रुग्ण आहेत,या रुग्णांमध्ये गजानन सोसायटी, मिशन हॉस्पिटल, पोलिस कस्टडी, एसआरपीएफ 5, बंगला साईड, रेल्वे कॉटर, कुंभार गल्ली, गोवा गल्ली या ठिकाणचे पेशंट आहेत, तर दौंड परिसरात कुरकुभ, श्रीगोंदा, गोपळवाडी, मलटण, माळवाडी, खोरवडी या ठिकाणी एकूण 17 रुग्ण आहेत तर 18 जणांचे RTPCR केले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली आहे, दौंड तालुक्यातील पश्चिम भागात पाटस,केडगाव,खामगाव, यवत, वाखारी, रावणगाव, सहजपूर, खुटबाव, बोरीऐंदी या ठिकाणचे 14 रुग्ण असल्याचे दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी सांगितले आहे. कोरणा रुग्णांचा हा आकडा त्रासदायक ठरणार आहे तरी प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News