किन्नर असूनही हिमांगी सखी यांचा महामंडलेश्वर होईपर्यंतचा संघर्षमय प्रवास


किन्नर असूनही हिमांगी सखी यांचा महामंडलेश्वर होईपर्यंतचा संघर्षमय प्रवास

मुंबईत राहणारी किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी सध्या वृंदावनच्या कुंभमेळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत

मुंबई / वृंदावन : वृंदावन येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात मुंबईत राहणाऱ्या किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी प्रथमच भाग घेतला आणि तेथे शाही स्नान केलेयामुळे त्या तेथील लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेतवृंदावनच्या कुंभपूर्व वैष्णव बैठकीत किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी भजनकीर्तन  प्रवचनासोबतच भाविकांना दर्शन देत आहेतकुंभमेळ्यात हजारों साधूसंत आणि महामंडलेश्वर यांनी आपले प्रस्थान मांडले आहेदेश विदेशातून आलेले भाविक या महामंडलेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेतहा कुंभमेळा 25 मार्च 2021पर्यंत चालणार आहे.

        मुंबईतील सुप्रसिद्ध प्रवचनकर्ता आणि भागवत कथावाचक किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी वृंदावनमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याबद्दल बोलताना म्हणाल्या, माझं शिक्षण आणि दीक्षा मी वृंदावनमध्येच घेतलीयेथेच मी शास्त्रांचा अभ्यास पूर्ण केलाब्रजवासियांसोबत येथे राहायला खूप बरं वाटतंमी माझं संपूर्ण तनमन आणि धन श्रीकृष्णाचरणी अर्पण केले आहेत्यांच्याच कृपाशिर्वादीने मी आज येथपर्यंत येऊन पोहोचले आहेत्यांनी माझे जीवन धन्य केले आहे.

 वास्तविक हिमांगी सखी यांचा जन्म गुजरातमधल्या वडोदरा येथे झाला आहेपण त्यानंतर लवकरच त्या मुंबईत स्थायिक झाल्याकारण त्यांचे वडील मुंबईत चित्रपट वितरक होतेबॉलीवूडचे शोमन स्वराज कपूर यांच्यासोबत त्यांनी बरेच काम केले आहेहिमांगी यांनी प्राथमिक शिक्षण कान्व्हेंट स्कूलमध्ये घेतलेआई आणि वडिलांच्या निधनानंतर हिमांगी यांचे शिक्षण सुटलेपुढे त्यांनी आपल्या बहिणीचे लग्न करून दिलेपोटा पाण्यासाठी त्यांनी शबनम मौसी, डाऊन टाऊन आणि थर्ड मॅन वगैरे चित्रपटांमध्ये काम केलेचॅनेल व्ही वरील "एक्स युवर एक्सआणि आयबीएन- चॅनेलच्या "जिंदगी लाइफ' शोमध्येही त्या आल्या होत्यामात्र त्यानंतर प्रभू श्रीकृष्णाकडे त्यांचा ओढा वाढला आणि त्यांनी सर्वस्वाचा त्याग करत वृंदावन गाठलेतेथे गुरूंकडून दीक्षा घेत धर्मशास्त्रांचा पुढील अभ्यास सुरू केला आणि येथपर्यंत पोहोचल्या आहेत.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News