साईसत्य पेट्रोलियमचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न


साईसत्य पेट्रोलियमचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :

शेवगाव शहरामध्ये रशियन टेक्नॉलॉजी असलेला साईसत्य हा अहमदनगर जिल्ह्यातील पहिला पेट्रोलियम पंप सुरू  

आदरणीय माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते शेवगाव शहरामध्ये रशियन टेक्नॉलॉजी असलेला साईसत्य या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या पेट्रोलियम पंपाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी बोलताना घुले म्हणाले की वकिली क्षेत्रात काळे यांचे खूप मोठे नाव असून त्यांनी पेट्रोलियम क्षेत्रात पदार्पण केले आहे . शेतकरी संघटनेच्या अनेक आंदोलनामध्ये नेहमी सक्रीय सहभाग असतो . निळवंडे धरणाच्या प्रलंबित  प्रश्नासाठी मा. उच्च न्यायालयात श्री काळे यांनी जनहित याचिका दाखल केल्याने राज्य शासन व केंद्र शासन यांनी निधी उपलब्ध करून द्यावा असा निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला निळवंडे   लाभक्षेत्रातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी 182 गावचा   प्रश्न  ॲड.काळे यांच्या माध्यमातून मार्गी लागला असे प्रशंसनीय उद्गार    माननीय चंद्रशेखर घुले यांनी साईसत्य पेट्रोलियम उद्घाटन प्रसंगी का


कोव्हिड19 नियमाचे पालन करीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष  ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे  होते. तर मा. आमदार चंद्रशेखर घुले , मा. पंचायत समिती सभापती अरुण लांडे ,पंडितकाका भोसले, भानुदास सुपारे, सरपंच शरद सोनवणे, सतिष पवार,ताराचंद लोढे, विष्णू पोटफोडे, ॲड सपकाळ , दर्शल पोखरकर, गिरीश वाणी, ऋषिकेश गव्हाणे,ॲड गव्हाणे, ॲड कोरडे, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष अनिल औताडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख बाळासाहेब पटारे, मारुतराव थोरात, निळवंडे कृती समिती अध्यक्ष रूपातात्या काले ,बबनराव धस, अशोकराव धस, विठ्ठलराव धस,मधुकर आवारे, अनिरुध्द धस,दीपक पटारे ,गिरीधर आसणे, रामनाथ राजापुरे ,गणेश मुजगल डॉ.आहेर कल्याण भांदरगे, डॉ.टकले , बाळासाहेब बोडखे, बिबीशन घनवट,ॲड भोसले, मधुकरराव हजारे, गणेश वाकचौरे, ब्रिजशेठ बाहेती.बाळासाहेब धस ,आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित बबनराव काळे यांनी केले तर सूत्रसंचालन एरंडगाव सरपंच संतोष धस यांनी केले व आभार मा. पंचायत समिती सदस्य  पंडित भागवत यांनी मानले.

अविनाश देशमुख शेवगांव *सामाजिक कार्यकर्ता

जाहिरात
Search
विडिओ
Recent News