प्रभाग क्र.11, राऊत मळा रस्त्याच्या कॉक्रीटीकर कामाचा शुभारंभ


प्रभाग क्र.11, राऊत मळा रस्त्याच्या कॉक्रीटीकर कामाचा शुभारंभ

विकास कामांची श्रृखंला अशीच कायम राहील -अविनाश घुले 

अहमदनगर (-प्रतिनिधी संजय सावंत) प्रभागाच्या विकासासाठी आपण कायम तत्पर राहिलो आहोत.  नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्यामुळे प्रभागातील अनेक कामांसाठी मोठा निधी उभारुन कामे मार्गी लागत आहेत. आता स्थायी समितीचा सभापती म्हणून नगर शहरातील विविध विकास कामे करण्यावर आपला भर असणार आहे. त्याचबरोबर प्रभागातील प्रलंबित कामेही पुढील काळात मार्गी लागून एक आदर्श प्रभाग करण्याचा आपला मानस आहे. नागरिकांना सर्व मुलभुत सुविधा मिळाव्यात, त्यांच्या समस्या दूर करण्यास प्राधान्य देत असल्याने अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत. पुढील काळातही विकास कामांची ही श्रृंखला अशीच कायम राहील, असे प्रतिपादन स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केले.

     प्रभाग क्र.11, राऊत मळा, सिताबन लॉन शेजारीला रस्त्याच्या कॉक्रीटीकर कामाचा शुभारंभ स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगरसेविका रुपाली पारगे, भा.कुरेशी, इम्रानभाई जहागिरदार, रुपसिंग कदम, श्रीमल गुंदेचा, बाबासाहेब काळे, भिमराज रासकर, रामचंद्र रासकर, नितीन भाटिया, भाऊसाहेब जाधव, मच्छिंद्र रासकर, अशोक काळे आदि उपस्थित होते.याप्रसंगी श्रीमल गुंदेचा म्हणाले,  नगरसेवक अविनाश घुले हे नेहमीच प्रभागातील समस्याबाबत जागृत असतात. नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देत प्रभागाचा विकास करत आहेत.  या भागातील रस्त्याची दुरावस्था झाली होती, आता हा रस्ता झाल्याने या भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. एक आदर्श प्रभागासाठी नागरिकांनीही लोकप्रतिनिधींना साथ देऊन आपल्या भागाचा विकास केला पाहिजे.

     याप्रसंगी नगरसेविका रुपाली पारगे, भा.कुरेशी आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अविनाश घुले यांची मनपा स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्रभागाच्या नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सौ.प्रणिता भंडारी, मोहिनी काळे, आरती रासकर, गिता भाटिया, कामिनी रासकर, चेतन जाधव आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक काळे यांनी केले तर आभार मच्छिंद्र रासकर यांनी मानले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News