पांडुळे यांची निवड सार्थ ठरेल -वसंत शिंदे मानवाधिकार संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गोवर्धन पांडुळे यांचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थांकडुन सत्कार


पांडुळे यांची  निवड सार्थ ठरेल -वसंत शिंदे मानवाधिकार संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गोवर्धन पांडुळे यांचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थांकडुन सत्कार

 नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) गोवर्धन पांडुळे यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमी धडपड असते.शिक्षकेतर महामंडळाचे पुणे विभागीय सचिव म्हणुन शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहुन शैक्षणिक कार्यात मोठे योगदान देत आहेत.पांडुळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मानवाधिकार संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.हि सार्थ निवड ठरेल.असे प्रतिपादन रुद्र अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वसंत शिंदे यांनी केले.                               हिंद सेवा मंडळाच्या,सिताराम सारडा विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक गोवर्धन पांडुळे यांची 'राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार' संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याबद्दल न्यू आर्ट्स कोंर्मर्स अँड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना,बॅच १९९६ ते १९९९ या वर्षातील मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रुद्र अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वसंत शिंदे बोलत होते.यावेळी सतिष बनकर,भिंगार शिवसेना महिला कार्यकर्त्यां कांता बोठे,भिंगार हायस्कूलच्या शिक्षिका सीमा चौधरी,विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,स्वराज्य टेक्निकलचे शाखाधिकारी नाना सोनवणे,नवनाथ सातपुते,रुद्र अपंग संघटनेचे जिल्हा सचिव बापू पांडुळे व पांडुळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.   

जाहिरात
Search
विडिओ
Recent News