वडगाव निंबाळकर येथे स्पोर्ट क्लबतर्फे ५ किलोमीटर भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न


वडगाव निंबाळकर येथे स्पोर्ट क्लबतर्फे ५ किलोमीटर भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

वडगाव निंबाळकर येथे स्पोर्ट क्लबतर्फे ५ किलोमीटर भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गौरव आगम, मयुर आगम, ऋषिकेश आगम, धीरज हिरवे व त्यांचे सर्व सहकारी मित्र यांच्यावतीने करण्यात आले.

   सदर स्पर्धेत वडगाव परिसरातील तसेच वाई, सातारा, नगर, करमाळा भागातील जवळपास ५०-६० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन वडगांव निंबाळकरचे सरपंच सुनील ढोले यांनी नारळ वाढवून व निशाणा फडकावून केले. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन व मार्गदर्शन पी.एम.गायकवाड सर, जाणता राजाचे अधक्ष्य जितेंद्र पवार, जय हिंद सेना प्रमुख पै. नानासाहेब मदने, सदस्य पिंटू किर्वे, दरेकर सर यांनी केले. 

   नंतर बक्षीस वाटपाचा कार्यक्रम श्रीनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन साठे, राहुल आगम, गायकवाड सर, नानासो मदने, संतोष गायकवाड, अमोल गायकवाड, पांडुरंग पवार, हरिभाऊ आगम यांच्या हस्ते पार पडला.

    प्रथम चार विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रु. ५००१, ३००१, २००१, व १००१ चे रोख बक्षीस ग्रामपंचायत सदस्य राहुल आगम, विनोद(आप्पा) लोणकर, प्रशांत कारंडे, लखन लोणकर यांनी दिले तर प्रथम चार विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व पहिल्या १५ विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक श्रीनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या वतीने देण्यात आले. गायकवाड सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

       सदरचा कार्यक्रम कोविडच्या संपूर्ण आदेशाचे पालन करून पार पाडण्यात आला. स्पोर्ट क्लबतर्फे सर्व स्पर्धकांना नाष्ट्याची सोय करण्यात आली. पोलिस स्टेशनचेही विशेष सहकार्य लाभले. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News