पळशीत जिरायत भाग पाणी परिषदेचे चर्चासत्र संपन्न, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण कामाविषयी चर्चा


पळशीत जिरायत भाग पाणी परिषदेचे चर्चासत्र संपन्न, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण कामाविषयी चर्चा

बारामती : प्रतिनिधी(काशिनाथ पिंगळे)

पळशी ता. बारामती येथील कृषी पर्यटन केंद्रात जिरायत भाग पाणी परिषदेचे चर्चासत्र रविवार दि.१४ मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते. 

   सदर चर्चासत्रात पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण कामाविषयी, जिरायत भागातील १००% क्षेत्र ओलिताखाली आणणे, सदर योजना श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे चालविण्यासाठी देण्याबाबत चर्चा, पाण्याच्या दराविषयी चर्चा, उर्वरित कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली. ही योजना पूर्ण क्षमतेने रन झाली पाहिजे. या ठिकाणी अनेक गावातील शेतकऱ्यांनी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या आऊटलेट तसेच दराबाबत असलेल्या अडचणी सांगितल्या. 

 सदर कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करावा असे ठरले. यावेळी जिरायत भाग पाणी परिषदेच्या अध्यक्षपदी हनुमंत भापकर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.

     या चर्चासत्रासाठी जिरायत भाग पाणी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत भापकर, पंचायत समिती सदस्य राहूल भापकर, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुरलीधर ठोंबरे, कृषी पर्यटन केंद्राचे प्रमुख पांडुरंग तावरे, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे मोरगाव शाखा अभियंता मोहन कांबळे, तरडोलीचे माजी सरपंच किसन तांबे, महेंद्र तांबे, मोहन जगदाळे, सतीश जगदाळे, पळशीचे सरपंच रावसाहेब चोरमले, मनोहर भापकर, भाऊसाहेब गुलदगड सर, हिरामण गडदरे, संदीप कोळेकर, निलेश मासाळ, पत्रकार काशिनाथ पिंगळे, गणेश पवार, माणिक मासाळ तसेच इतर मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News