वंचितांना आधार देण्याचा महात्मा फुले व सावित्राबाई फुलेंचा वारसा फिनिक्स फाऊंडेशन चालवित आहे -इंजी. सायली पाटील


वंचितांना आधार देण्याचा महात्मा फुले व सावित्राबाई फुलेंचा वारसा फिनिक्स फाऊंडेशन चालवित आहे -इंजी. सायली पाटील

 फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने गरजूंची मोफत नेत्र तपासणी 

27 ज्येष्ठ महिलांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

62 गरजू रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - देशात स्त्रीला सन्मान व प्रतिष्ठा सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षण चळवळीने मिळाली आहे. महिला शिकल्यानेच आज सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करीत असून, महिला सक्षमीकरणाचे खरे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन महात्मा फुलेंनी पुरोगामी विचारांची मांडणी केली व ते प्रश्‍न सोडविण्याचे कार्य केले. वंचित घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा देऊन त्यांचा वारसा फिनिक्स सोशल फाऊंडेशन पुढे चालवत आहे. पाटबंधारे विभागातील कर्मचारी असलेले जालिंदर बोरुडे यांनी उभे केलेले सामाजिक कार्य संपुर्ण विभागासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याची भावना मुळा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता इंजी. सायली पाटील यांनी केले. फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यावेळी इंजी. पाटील बोलत होत्या. मा.आ. शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका पुष्पा बोरुडे, सुप्रिया जाधव, सरपंच सविता पानमळकर, युट्यूब स्टार सुमन धामणे, माधुरीताई कृष्णा जाधव, प्रा. सिमा दिलीप गायकवाड, हिराताई वसंतराव बोरुडे, सामाजिक कार्यकर्त्या शारदा होशिंग, जागृती ओबेरॉय, माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, प्रा.दिलीप गायकवाड, राम पानमळकर, रतन तुपविहीरे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कार्याने समाजाला एक दिशा दिली. त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने फिनिक्स फाऊंडेशन वंचित घटकातील रुग्णांची सेवा करीत आहे. अनेक गरजू रुग्णांना आधार देण्याचे कार्य अविरतपणे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मा.आ. शिवाजी कर्डिले यांनी विविध क्षेत्रात महिलांचे प्रमाणिकपणे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. सावित्रीबाईंनी महिलांना स्त्री शिक्षणाचे दार उघडे करुन दिल्याने महिलांनी घरचा उंबरा ओलांडून अनेक क्षेत्रात आपले नांव उज्वल केले आहे. महिला समाजाच्या जडण-घडणीत महत्त्वाचे योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 238 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. ओमकार वाघमारे, किरण कवडे यांनी रुग्णांची तपासणी केली. 62 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. फिनिक्स फाऊंडेशनच्या आवहानाला प्रतिसाद देत 27 ज्येष्ठ महिलांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. यावेळी गरजूंना मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पाळन करुन हे शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले. आभार गौरव बोरुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर गांगर्डे, बाबासाहेब धीवर, सौरभ बोरुडे, ओम बोरुडे, सागर बनकर, प्रभाकर धाडगे, मोहनीराज कुर्‍हे, सुदाम वाबळे, अर्जुन कराळे, साई धाडगे आदींनी परिश्रम घेतले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News