मुुख्य सुत्रधार बाळ बोठे ला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी


मुुख्य सुत्रधार बाळ बोठे ला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर (प्रतिनिधी :संंजय सावंत) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला काल, शनिवारी पोलिसांनी अटक केली होती. आज त्याला पारनेर न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे हा काही महिन्यापासून फरार होता. त्यास हैदराबाद येथून पोलिसांनी काल अटक केली. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सरकारी वकील यांनी आरोपी बोठे यांच्याकडून घटनेबाबत माहिती जाणून घ्यायचे असून हा कट का रचला ? तसेच यामध्ये अजून कोणी आरोपी सहभागी आहे का ? यासाठी आरोपीला पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. तर आरोपीच्या वतीने वकील महेश तवले यांनी बाजू मांडली. सागर भिंगारदिवे यासह आरोपी ताब्यात आहेत. कट कुठे रचला गेला ? काय रचला गेला ? या संदर्भात पंचनामे झाले आहेत. हत्या झाली तेथील पंचनामे झाले आहेत. चार्जशीट आलेले आहे. मोबाईल देखील सर्व जमा आहेत. त्यामुळे या घटनेचा सर्व तपास जवळजवळ पूर्ण झाला आहे. भिंगारदिवे ला सुपारी किती दिली होती , यासंदर्भात सर्व माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे बाळ बोठे यास पोलिस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी मिळावी, असा युक्तिवाद तवले याने केला. तर, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी आरोपीने कटकारस्थान कशासाठी रचले ? यामध्ये अजून कोणी सहभागी होते का ? यासाठी आरोपीला पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयासमोर केली होती. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बोठे यांना २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News