कुरकुंभ एमआयडीसी मधील बंद कंपनीतील गवताला आग,मोठी हानी टळली


कुरकुंभ एमआयडीसी मधील बंद कंपनीतील गवताला आग,मोठी हानी टळली

सुरज बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

कुरकुंभ एम आय डी सी मधील स्नेहा अँटिबायोटिक बंद कंपनीच्या आवारातील गवताला दि.१४/३/२०२१ रोजी दुपारी अचानक आग लागली.औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी हि आग वेळेत उपस्थित राहून आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करून आग विझवण्याचे काम केले. त्यामुळे मोठी हानी टळली.मागील अनेक दिवसांपासून कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील येथील स्नेहा अ‍ॅन्टीबायोटिक ही कंपनी बंद आहे, सध्या उन्हाळा असल्याने याठिकाणी गवत आणि झाडांचा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात  कंपनीच्या आवारात पसरला


जाहिरात

आहे,  त्यातच कंपनीला गेट नसल्याने  कोणीही ये-जा करीत आहे, यामुळे  दरम्यान, गवत आणि पालापाचोळ्या आग लागल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली होती, घटनेची माहिती मिळताच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्नीशामक बंब उपस्थित करण्यात आले, काही वेळातच अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली, यामुळे पुढील संभाव्य धोका टळला,. मात्र कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपनीला आग लागण्याच्या घटना यापूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत, आणि सातत्याने अशा घटना घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही, यामुळे  त्यादृष्टीने या वसाहतीत पुरेसा प्रमाणात योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News