नुकतीच खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या शेवगाव पोलीस स्टेशनचे शेखर डोमाळे व योगेश गणगे व जीवन रक्षा पदक देऊन ज्यांना सन्मानित


नुकतीच खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या शेवगाव पोलीस स्टेशनचे शेखर डोमाळे व योगेश गणगे व जीवन रक्षा पदक देऊन ज्यांना सन्मानित

नुकतीच खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या शेवगाव पोलीस स्टेशनचे शेखर डोमाळे व योगेश गणगे व जीवन रक्षा पदक देऊन ज्यांना सन्मानित करण्यात आले त्यांचा जनशक्ती मंच चे अध्यक्ष श्री शिवाजीराव काकडे यांच्या हस्ते सन्मान 

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

आपण कष्टाने जिद्दीने मिळवलेले यश फार मोठे आहे. तुमच्या यशाबद्दल  तालुक्याला व आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. तालुक्यातील युवकांनी तुमचा आदर्श घेऊन अशीच उंच भरारी मारली पाहिजे असे प्रतिपादन जनशक्तीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव येथे केले. नुकतीच खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या शेवगाव पोलीस स्टेशनचे शेखर डोमाळे व योगेश गणगे व जीवन रक्षा पदक देऊन ज्यांना सन्मानित करण्यात आले असे बाळासाहेब नागरगोजे यांच्या यशाबद्दल आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह व जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज शेवगाव येथे घेण्यात आला. यावेळी ते अध्यक्ष स्थानी बोलत होते. याप्रसंगी सचिन आधाट, अरुण काळे, प्रा. लक्ष्मण बिटाळ, विनोद मोहिते, बंडूभाऊ देहाडराय, शिवाजी कणसे, हरिभाऊ चेडे, राजूमामा फलके, हेमंत पातकळ आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी अॅड.काकडे म्हणाले की, तुम्ही जिद्द व कष्टाच्या जोरावर हे यश संपादित केले आहे. तुम्ही मिळविलेल्या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही नेहमी तालुक्यातील मुलांसाठी असे प्रोत्साहन पर कार्यक्रम घेत असतोत.  लवकरच शेवगाव येथे तळागाळातील गोरगरीब मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना काकडे शैक्षणिक समूह करणार आहे. शेवगाव तालुक्यातील युवकांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उतरून आजच्या सत्कार मूर्तींचा आदर्श घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना उपनिरीक्षक पदी निवड झालेले योगेश गणगे म्हणाले की, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करून मला घडवलेले आहे. त्यामुळे येथून पुढे गरिबांचे आश्रू पुसण्याचे काम आम्ही सेवा बजावताना करणार आहोत. तालुक्यामध्ये आमचा सत्कार होतो ही माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे असेही ते बोलताना म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय नजन यांनी केले तर आभार अमोल निकम यांनी मानले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News