महालॅबच्या वतीने भिगवण पोलीसांची मोफत रक्त तपासणी- जीवन माने


महालॅबच्या वतीने भिगवण पोलीसांची मोफत रक्त तपासणी- जीवन माने

भिगवण(प्रतिनिधी) नानासाहेब मारकड

महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांच्या सौजन्याने भिगवण पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या  मोफत रक्त तपासणी व  चाचणी करण्यात आली.

 मा.ना. दत्तात्रय मामा भरणे (राज्यमंत्री) महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सोलापूर जिल्हा.यांच्या मार्गदर्शनाखाल्री  महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची मोफत रक्त चाचणी केली  जंक्शन गावाचे माजी उपसरपंच श्री फिरोज सय्यद यांनी विशेष सहकार्य केले. आज दि.13 मार्च रोजी पोलिस स्टेशन येथे रक्त चाचणी करण्यात आली यावेळी प्रभारी अधिकारी भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जीवन माने साहेब व पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील व सर्व कर्मचारी यांची चाचणी करण्यात आली यावेळी मोलाचे योगदान हिंद महालॅब च्या अंतर्गत लॅब टेक्निशियन प्राथमिक आरोग्य केंद्र कळसचे श्री सूरज जमाल सय्यद, एल. बी.एम. श्री.मिलिंद पवार ,लॅब इनचार्ज प्रदीप मुळीक, अजित गायकवाड, रेश्मा चौगुले मॅडम, नागनाथ जाधव,सोहेल मुलाणी,प्रा.आ. केंद्र संसर प्रशांत बनसोडे, प्रा.आ. केंद्र लासुर्णे आकाश जामदार या टीम ने हे कार्य यशस्वी रित्या पार पाडली. यावेळी सर्व टीमचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री जीवन माने साहेब यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News