बाळ बोठेला फरार असताना मदत करणारेही अटकेत, नगरमधील तनपुरेचा समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बाळ बोठेला अखेर पोलिसांच्या हाती लागला. शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होते. पाच दिवसांपासून पोलिसांची सहा पथकं बोठेच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना माहिती होऊ नये म्हणून हॉटेलमधील रुमचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला होता. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या, अशी माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी भिंगारदिवे याला अटक केली होती. तर बोठे मात्र फरार झाला होता. फरार होताना त्याने त्याचे दोन्ही मोबाइल घरीच ठेवले होते. पोलिसांनी हे मोबाइल जप्त केलेले आहेत. तसेच बोठे याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाच पोलीस पथक रवाना करण्यात आलेली होती. तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील व गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील बोठे याच्या बंगल्याची झडतीही घेतली होती. झडतीत पोलिसांना बोठे याचे रिव्हॉल्वर मिळून आले होते. बोठे याच्याकडे शस्त्रपरवाना असल्याचं तसेच तपासात महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही वस्तूही मिळून आल्या होत्या.बोठे याला अटक करण्यासाठी मुंबई, सोलापूरसह हैदराबाद पोलिसांची मदत अहमदनगर पोलिसांनी घेतली होती. बोठे हैदराबादमध्ये असल्याचे माहिती झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, याची माहिती मिळाल्याने आरोपी बोठे काही मिनिटांच्या अंतराने पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
बाळ बोठे हा हैद्राबाद मध्ये वेषांतर करून राहत होता. तेथील एका हॉटेल मधल्या रुम नंबर १०९ मध्ये बी. जे. बी या नावाने तो राहत होता . या रुम ला पुढून कुलूप लावलेले असून मागच्या दाराने तो ये-जा करत असे. बाळ बोठे सह त्याच्या तीन सहकाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांचे नावे पुढील प्रमाणे – १) बाळ जगन्नाथ बोठे रा. बालीकाश्रम रोड कमलनयन हॉस्पिटल समोर , २) राजशेखर अजय चाकाली वय २५ रा, गुडुर करीमनगर मुस्ताबाद आंध्रप्रदेश तेलंगणा ३) शेख इस्माईल शेख आली वय 30 वर्षे राहणार खुबा कॉलनी शाईन नगर बालापुर सुरुरनगर रंगारेड्डी आंध्रप्रदेश तेलंगणा, ४)अब्दुल रहमान अब्दुल आरिफ वय 52 वर्षे राहणार चारमिनार मज्जित पहाडी शरीफ सुरूर नगर रंगा रेड्डी हैद्राबाद आंध्रप्रदेश ५) महेश वसंतराव तनपुरे वय 40 वर्षे धंदा व्यवसाय राहणार कुलस्वामिनी गजानन हाउसिंग सोसायटी नवलेनगर गुलमोहर रोड सावेडी अहमदनगर ६) जनार्दन अकुले चंद्रप्पा राहणार 14 -113 फ्लॅट नंबर 301 त्रिवेणी निवास रामनगर पी अँण्ड टी कॉलनी सारोमानगर रंगारेड्डी हैदराबाद तेलंगणा यांना अटक करण्यात आली असून पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी रा हेंद्राबाद तेलंगणा फरार आहे. महेश वसंत तनपुरे यास नगरमध्येच अटक करण्यात आली असून पैकी राजशेखर चाकाली शेख इस्माईल शेख आणि अब्दुल रहमान अब्दुल आरिफ यांना पारनेर न्यायालयात हजार करण्यात आलं असून त्यांना १६ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. नगर क्राईम ब्रांचच्या पथकाने ५ दिवसांच् ऑपरेशन करून औरंगाबाद पोलीस हैदराबाद पोलीस कमिश्नर यांच्या मदतीने आणि शेवटचे २४ तास तर न झोपता कारवाई करून या आरोपींना अटक करण्यात आली या मध्ये सोलापूर मुंबई क्राईम ब्रांच सायबर टेक्निकल अनालिसिस च्या आधारे केलेल्या विशलेषणामुळे या कारवाईला यश आले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील नगर ग्रामीण विभागाचे अनिल कटके , कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यादव , संभाजी गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक गडकरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप , मिथुन घुगे , दिवटे, समाधान सोळंखे , पो. हे. कॉ. रवींद्र पांडे , पो.ना. रविकिरण सोनटक्के , दीपक शिंदे , राहुल गुंडू , अभिजित अरकल, महिला पोना जयश्री फुंदे , पो.ना. संतोष लोंढे , गणेश धुमाळ , भुजंग बडे, पो.कॉ . सचिन वीर , सत्यम शिंदे , चौघुले, मिसाळ , सानप , रणजित जाधव , बुगे , जाधव , चा.पो.कॉ जाधव , दातीर , पो.कॉ प्रकाश वाघ चापोना राहुल डोळसे , चा.पो.कॉ रितेश वेताळ, आदींनी हि कारवाई केली.