दौंड तालुक्याचा पश्चिम भाग बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, एका दिवसात 24 रुग्ण


दौंड तालुक्याचा पश्चिम भाग बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, एका दिवसात 24 रुग्ण

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पश्चिम भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे, या भागात रोजच रुग्ण सापडत आहेत, ही परिस्थिती अशीच राहिली तर दौंड तालुक्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे, ग्रामीण भागातील लोकांनी लग्न समारंभ,अंत्यविधी अशा ठिकाणी गर्दी करू नये असे आव्हान दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी केले आहे,


जाहीरात.. काल एका दिवसात यवत 6, लिंगाळी 6, वाळकी 4,भरतगाव, खामगाव, नाथाची वाडी, सहजपूर, कुरकुंभ, खडकी, कासुर्डी या ठिकाणी प्रत्येकी एक कोरोना रुग्ण सापडला आहे अशी माहिती दौंड तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी दिली आहे,दौंड शहरासह तालुक्यात कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत ही दौंड शहर व तालुक्यासाठी धोक्याची घंटा असून जनतेनेच कोरोना विषयी गांभीर्याने घेतले पाहिजे शासनाचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे अशा सर्वच गोष्टींचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टर सुरेखा पोळ यांनी यावेळी व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News